पांगरी (गणेश गोडसे) पांगरीसारख्या ग्रामीण भागातून हरहुन्नरी कलाकार तयार होत आहेत ही बाब खरोखरच कौतुकास्पद असून यातून स्फूर्ती घेऊन ग्रामीण भागात नवीन उदयोन्मुख कलाकार उदयास येतील असे प्रतिपादन पांगरी पोलिस ठाण्याचे अधिकारी राजू राठोड यांनी केले.ते पांगरी ता.बार्शी
येथील नीलकंठेश्वर मंदिरात 'शब्द प्रेमाचे'  या चित्रपटाच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विजय गोडसे होते.
  राठोड पुढे बोलताना म्हणाले की या चित्रपटात  प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारत असलेल्या पांगरीच्या कु.वैष्णवी जानराव हिच्यामुळे पांगरीचे नांव महाराष्ट्राच्या नकाशावर कोरले जात असून एखाद्या कलाकारामुळे गावाची ओळख तयार निर्माण होत असते.पांगरीसारख्या डोंगरी ग्रामीण भागात कसलाही वारसा नसतानाही शारी भागातील कलाकारांना लाजवेल असे कलाकार तयार होत आहेत. विविध सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातील सहभागाबरोबरच 'पुढारी'सारखे वृतपत्र ग्रामीण भागातील कलाकारांना पाठबळ देत आहे ही गौरवाची गोष्ट आहे.कु.जानराव हिने यापूर्वी ‘प्रेम स्पर्श’,’प्रेमा तुझा रंग कसा’ आदी चित्रपटात काम केले आहे.
   यावेळी माजी सरपंच तात्या बोधे,विष्णु जानराव,दत्ता भालेराव,प्रसाद औटी,रंगनाथ जानराव,यांच्यासह डॉ.शरद पवार,विनोद चव्हाण,अजित देशमुख,कैलास तोडकर,सूर्यकांत घोडके,अशोक वाघमारे,सिने अभिनेत्री वैष्णवी जानराव,श्रीकांत पाटील,नितिन चव्हाण,नितिन सदाफुले,पत्रकार गणेश गोडसे,बाबा शिंदे,ऋषिकेश घोडके, आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन शरद बसवंत यांनी केले.
चौकट: वैष्णवी जानराव(अभिनेत्री) :ग्रामीण भागातील बालकलाकारांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दैनिक पुढारी पांगरीत अनेक वर्षापासून राबवत असलेल्या नृत्य स्पर्धेचा माझ्या जडणघडणेत मोठा सहभाग असून यामुळेच मला कला सादर करण्यास संधी मिळाली.पुढारीच्या स्पर्धेत प्रथम माणकरी ठरल्यानंतर तेथूनच स्फूर्ती मिळाल्याचे जानराव यांनी सांगितले.

 
Top