नळदुर्ग -  जमिनीची धुप थांबवण्‍यासाठी व दुष्‍काळावर मात करण्‍यासाठी वृक्षारोपन व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज लक्षात घेवून '' एक विद्यार्थी एक झाड लावणे'' गरजेचे असल्‍याचे अवाहन परिवर्तन सामाजिक संस्‍थेचे सचिव मारूती बनसोडे यांनी केले  जि.प. कन्‍या प्रशाला नळदुर्ग येथील विद्यार्थींनीनी पर्यावरण संवर्धनासाठी घेतली वृक्ष  लावण्‍याची शपथ. 
    पर्यावरण व वने, हवामान बदल मंत्रालय भारत सरकार व बायस संस्‍था पुणे आणि परिवर्तन सामाजिक संस्‍था नळदुर्ग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित राष्‍ट्रीय पर्यावरण जनजागृती मोहीम 2015 च्‍या अंतर्गत नळदुर्ग  येथील जि.प. कन्‍या प्रशाला येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी मारूती बनसोडे बोलत होते. 
    या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कन्‍या प्रशालेचे प्रभारी मुख्‍याध्‍यापक गौतम राठोड हे होते. पुढे बोलताना मारूती बनसोडे म्‍हणाले की, बदलत्‍या हवामानामुळे मानवांच्‍या जीवनावर अनेक परिणाम होत आहे. दिवसेन दिवस तापमानात वाढ होवून जमिनिची धूप वाढत आहे. त्‍यामुळे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्‍या चळवळीला गती देण्‍याची गरज आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार गुंजीरे  यांनी केले. यावेळी कार्यकर्ते दादासाहेब बनसोडे, माने,  राठोड व  विद्यार्थी उपस्थित होते. 

 
Top