जळकोट (संजय रेणुके)  जळकोट ता. तुळजापूर येथे शिवरत्‍न बहुउद्देशिय सामाजिक सेवाभावी संस्‍था जळकोट अंकित सार्वजनिक शिवजन्‍मोत्‍सव समिती व अश्विनी सहकारी रूग्‍णालय व संशोधन केंद्र सोलापूर यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने हिंदवी स्‍वराज्‍य संस्‍थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या 385 व्‍या जयंतीनिमित्‍त जळकोट येथे दि. 1 मार्च 2015 रोजी मोफत आरोग्‍य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्‍यात आल्‍याचे संयोजन समितीच्‍यावतीने सांगण्‍यात आले. 
   उपरोक्‍त शिबीर सकाळी 9 ते 4 या वेळेत जिल्‍हा परिषद प्रशालेच्‍या नवीन इमारतीमध्‍ये संपन्‍न होणार असून याप्रसंगी उदघाटक म्‍हणून उस्‍मानाबाद जिल्‍हा नियोजन अधिकारी एम.के. भांगे, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थनी उस्‍मानाबाद बार काऊंन्‍सीलचे उपाध्‍यक्ष अॅड अंगदराव तुकाराम कदम, तर नळदुर्ग पोलिस ठाण्‍याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.वाय डांगे,  नायब तहसिलदार माणिक चव्‍हाण,डि.एच.ओ अश्विनी सहकारी रूग्‍णालय सोलापूर  एस.बी पाटील, निवृत्‍त पोलिस निरीक्षक ए.बी. कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या शिबीरात उपस्थित लाभार्थींचे अश्विनी सहकारी रूग्‍णालयातील विविध तज्ञ डॉ. उपस्थित राहून सपासणी व उपचार करणार आहेत. इतकेच नव्‍हे तर रूग्‍णांना मोफत औषधांचे वाटपही करण्‍यात येणार असल्‍याचे यावेळी संयोजकाकडून सांगण्‍यात आले. त्‍याचबरोबर स्‍वाइन फ्ल्‍यू, चिकन गुणिया, व संधीवात आदी रोगासंदर्भात सल्‍ला व मार्गदर्शन करणार आहेत. शिबीरासंदर्भात  परिसरातील इच्‍छुकांनी  जळकोट येथील ज्ञानसंजिवनी क्‍ि‍लनीकचे डॉ. संजय कदम यांच्‍याशी संपर्क साधण्‍याचे अवाहन करण्‍यात आले. 

 
Top