उस्मानाबाद -  जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी  अधिकारी सुमन रावत यांच्या प्रमुख उपस्थित येथील  क्लबच्या मैदानावर राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान/ स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबादच्यावतीने स्वयंसहाय्यता आदया जिल्हास्तरीय समुह बचत गट निर्मीती वस्तुचे प्रदर्शन व विक्रीचा समारोप करण्यात आला. 
या समारोपप्रसंगी प्रदर्शनात उत्कृष्‍ट ठरलेल्या खादयपदार्थ गटात उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथील वैभवी महिला बचत गट व जिल्हा बाहेरील गटात बीड तालुक्यातील वासनवाडी येथील जय हनुमान बचत गटास पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. स्वयंसहासय्ता समुहांतर्गत- प्रथम क्रमांक तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील माऊली स्वयंसहायता समुह गटाने पटकाविला तर उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील  सागर स्वयंसहायता समुह गटाने व्दितीय, तर  वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथील स्वयंसहायता गट नृसिंह स्वयंसहायता समुह गटाने तृतीय क्रमांक पटकाविल्याबदल त्या गटास  मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत डॉ. रुपाली सातपुते,  दुपारगुडे, श्री. गुंजाळ यांनी महिलांनी स्त्रीभ्रण हत्या व शौचालयाच्या वापर करण्याबाबत  सर्व उपस्थित महिलाना शपथ देवून  मोलाचे  मार्गदर्शन केले. 
याप्रसंगी जिल्हा अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक श्री. दुपारगुडे, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपूते, श्री. गुंजाळ उपसंचालक, एमएसआरएलएम, मुंबई, दीपाली कांबळे पशूसंवर्धन  अधिकारी  यांची प्रमुख उपस्थिती होती. महिला प्रतीनिधी शामल शिंदे, केमवाडी  तारामती लाड, बीड यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. 
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन डी. एस. कदम यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी प्रदर्शन श्री. माटे यांनी मानले. 
 
Top