उस्मानाबाद - आदिवासी विकास विभाग यांच्यामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली करीता नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाबाबत योजना राबविण्यात येत आहे. सन 2015-16 करीता प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, सोलापूर मार्फत प्रवेशासाठी विद्यार्थी निवड करण्याकरीता प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुन्हा 30 एप्रिलपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.  तरी अनुसूचित जमातीच्या इच्छुक पालकांनी सदर योजनेचा लाभ  घेण्यासाठी दि. 30 एप्रिल,2015 पर्यंत आवश्यक कागदपत्रासह संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी,एकात्मिक  आदिवासी विकास प्रकल्प,सोलापूर यांनी केले आहे.
        विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, जर विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असल्यास यादीतील अनुक्रमांक नमूद करावा. त्याचे वय 5 वर्षे पूर्ण झालेले असावे., विद्यार्थ्यांचा जन्म दि.1 जून 2009 ते 1 जून 2010 दरम्यान झालेला असावा. त्यासोबत जन्म तारखेसाठी ग्रामसेवक अथवा अंगणवाडीचा दाखला देण्यात यावा., इयत्ता 1 ली प्रवेश घेण्यास पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी नजीकच्या शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांकडे नाव नोंदणी करावी किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,सोलापूर या कार्यालयास संपर्क साधावा., या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे संमतीपत्र घ्यावे व सोबत शाळेत प्रवेशासाठी अर्जही द्यावा. तसेच अर्जासोबत दोन पासपोर्ट आकाराचे फोटो द्यावेत., अर्जासोबत विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात यावे, आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा/घटस्फोटित/निराधार/परित्यक्ता व दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्राधान्याने निवड करुन त्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल., विद्यार्थ्यांचे पालक शासकीय/निमशासकीय नोकरदार नसावेत व खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल., निवड केलेल्या विद्यार्थ्यांला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या व पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही., सन 2014-15 या आर्थीक वर्षातील रुपये 1 लाख वार्षीक उत्पन्न मर्यादा व सक्षम अधिकाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र असावे. तसेच विद्यार्थी व पालकांवर विहित केलेल्या अटी व शर्ती लागू राहतील,याचीही नोंद घ्यावी.  अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 0217-2607600 / भ्रमणध्वनी क्रमांक : 7276202249 श्री.अनपट शिक्षण विस्तार अधिकारी तथा सहायक प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.                           
 
Top