उस्मानाबाद -  जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात बिल पोर्टल संदर्भात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  जिल्हा परिषदेचे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) शिरीष बनसोडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीचे लेखाधिकारी डी. एम. कुलकर्णी हे होते. 
         याप्रसंगी उप कोषागार अधिकारी एस. बी. देगावकर. कोषागार कार्यालयाचे श्री.पोतदार, राहूल मगरे, ए. एस. सीताफुले, एस. एन.बुंधे यांच्यासह विविध कार्यालयाचे आहरण व संवितरण अधिकारी व प्रतिनिधींची उपस्थिती होती.  
        श्री.कुलकर्णी यांनी  बील पोर्टल या प्रणालीमुळे व्यवहारात पारदर्शकता येईल, त्यामुळे दुबार देयक सादर करतांना तात्काळ त्यांची नोंद होत असल्याने त्याचा दुरुपयोग टाळता येईल. यावेळी त्यांनी आहरण व संवितरण अधिकारी यांनी मांडलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.     
         श्री.बनसोडे म्हणाले की, ई- गव्हर्नेस, ई-पोर्टल ऑनलाईन प्रणालीची  अंमलबजावणी तात्काळ सुरु झाली आहे. त्यामुळे या प्रशिक्षणातून देयके सादर करतांना येणाऱ्या अडचणी सर्वांनी जाणून घ्याव्यात. सेवार्थ बिल पोर्टल या प्रणाली मुळे कामकाजावर ई-मॉनिटरींग करण्यात येत असल्याने ही आनंददायी बाब आहे. जिल्हा कोषागार कार्यालयाचे प्रशिक्षण प्रमुख श्री.सीताफुले यांनी बिल पोर्टलमघ्ये काम करतांना ते सुलभ कसे होईल, याबाबत सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन राहुल मगरे यांनी केले तर आभार शंकर बुंधे यांनी मानले.                       
 
Top