बार्शी -  कामावरुन घरी परत जाणार्‍या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी माजी सैनिक तलाठी आनंद डोके (वय ४५) रा. देशमुख प्लॉट यास ३ महिने सश्रम कारावास ३० हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायदंडाधिकारी भागवत झिरपे यांच्या न्यायालयात ठोठावण्यात आली. २५ हजार रुपये पिडीत महिलेस देण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. सरकार पक्षातर्फे ऍड्.प्रसाद कुलकर्णी यांनी काम पाहिले.
कचेरी रोड वरील बेदराई विहीरीजवळ २ जून २०१३ रोजी पिडीत महिला कामावरुन घरी परतत असतांना रात्री १० च्या दरम्यान सदरची घटना घडली होती. आरोपीने महिलेस आपल्या दुचाकीवर बसून सोबत येण्याचा आग्रह करत अंगावरील वस्त्र ओढून बळजबरी केली होती. यावेळी नागरिकांनी महिलेला त्याच्यापासून सोडवून आरोपीस पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
 
Top