उस्मानाबाद - महाराष्ट्र ‌उद्योजकता विकासकेंद्र,उस्मानाबाद आयोजित  बेरोजगार  युवक/ युवतीसाठी परंडा  येथे दुग्धव्यवसाय,शेळी व कुक्कुट पालन  प्रशिक्षण दि.14 ते 24 सप्टेंबर,2015 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. 
         या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संपूर्ण दुग्ध व्यवसायाचे गायीच्या जाती, चाऱ्याचे नियोजन, लसीकरण, दुधाचे पॅकिंग, दुधविक्री तसेच शेळी पालन,उस्मानाबादी शेळीचे महत्व,करडयाची निगा, शेळीचे लसीकरण, शेळीचे आहार व आजाराविषयी माहिती, अर्ध ‍बंदिस्त व बंदिस्त शेडची माहिती, शेळीच्या वेगवेगळया जातीची माहिती व कुक्कुटपालन मध्ये गावरान व बॉयलर  याविषयी ‍सविस्तर माहिती तसेच त्यांच्या खाद्याची व शेडची माहिती, विमा,आजाराविषयी माहिती तज्ञ व्यक्तीकडून दिली जाणार आहे.  तरी इच्छुक युवक/युवतींनी अधिक माहिती व अर्जासाठी कार्यक्रम समन्वयक किशोर कांबळे भ्रमणध्वनी 9881558846 यांच्याशी पंचायत समिती, परांडा येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एमसीईडी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्ये केले आहे .           

 
Top