उस्मानाबाद - क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी ,उस्मानबाद तर्फे युवक कल्याण अनुदान योजना सन 2015-16 करीता सर्वसाधारण व विशेष घटक योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्था , महिला मंडळे, क्रीडा मंडळे , बहु. संस्था यांच्याकडून स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबीर आयोजनाकरीता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
सदर प्रस्तावाचे विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा परिषद ,उस्मानबादद्वारा उपलब्ध करुन देण्यात आले असून त्याचे दर्शनी मुल्य रु. 100/- आहे . विहीत नमुन्यातील अर्ज दि. 15 ते 21 सप्टेंबर 2015 या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , श्री. तुळजाभवानी स्टेडीयम ,उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात येतील . दि. 30 सप्टेंबर पर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील . कोणत्याही परिस्थीतीत अपूर्ण व विहीत मुदतीनंतर आलेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी .
तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत संस्था क्रीडामंडळे , सेवाभावी संस्था यांनी नोंद घेवून विहीत कालावधीत प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे आवाहन आहे