उस्मानाबाद - संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार  विकास महामंडळ मर्यादीत मुंबई यांच्याकडून महाराष्ट्रातील  जिल्ह्यामध्ये  चर्मकार  समाजातील  कुटुंबामधील पात्र मुला- मुलींसाठी प्रशिक्षण योजना ही त्यांच्या व्यावसायीक कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने  राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी  खालील अटी पूर्ण  करीत असलेल्या  संस्थांकडून  प्रशिक्षण  देण्याकरीता  या जाहिरातीद्वारे प्रस्ताव  मागविण्यात येत आहेत.
          संस्थेस  व्यवसाय शिक्षण  व प्रशिक्षण संचालनालय मुंबई, तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई  व्यवसाय  शिक्षण प्रमाणपत्र परीक्षा मंडळ, मुंबई  यांच्याकडून  मान्यता अथवा  इतर तत्सम  संस्थांशी  संलग्नता असावी ,सदर संस्था  मागील  सलग पाच वर्षांपासून कार्यरत असावी,  संस्थेचे मागील  तीन वर्षांचे  ऑडीट  पूर्ण झालेले असावे, संस्थेकडे  ट्रेडनिहाय  प्रशिक्षणासाठी  प्रशस्त जागा, यंत्रसामग्री व प्रशिक्षित  कर्मचारी वर्ग असावा ,  सदर संस्थेकडून  मागील तीन  वर्षात  ट्रेडनिहाय  किती प्रशिक्षणार्थींना  वर्षनिहाय  प्रशिक्षण दिलेले  आहे , याचा तपशील देण्यात यावा,संस्थेमार्फत  मागील  तीन वर्षात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर  किती  प्रशिक्षणार्थींनी  स्वत:चा व्यवसाय  सुरु केलाआहे / नोकरी  मिळाली आहे  याचा तपशील  देण्यात यावा ,  सदर संस्थेने प्रशिक्षण  देणाऱ्या  प्रशिक्षणार्थींपैकी  30 टक्के  महिला  प्रशिक्षणार्थी  असणे आवश्यक आहे, सदर संस्थेस  शासन  मान्यतेप्रमाणे  एका वर्षात  ट्रेडनिहाय  किती विद्यार्थ्यांची  प्रशिक्षणासाठी  मान्यता असल्याबाबतचा  सविस्तर  तपशील देण्यात यावा,  प्रशिक्षण पूर्ण्  केल्यानंतर  सदर ट्रेडची  परीक्षा कोणामार्फत  घेतली  जाईल याचा तपशील  देण्यात यावा,  प्रशिक्षण पूर्ण  केल्यानंतर  जॉब  प्लेसमेंटकरीता  आपणांकडून  काय कार्यवाही करण्यात येते व स्वयंरोजगार  थाटण्यासाठी  कोणती मदत प्रशिक्षणार्थीस  करण्यात येते. याकरीता  आपणाकडे  कोणती यंत्रणा  कार्यरत आहे याचा तपशील देण्यात यावा,  बाहेरगावच्या  प्रशिक्षणार्थ्यांसाठी  राहण्याची व भोजनाची व्यवस्था  होऊ शकेल काय याबाबतचा  तपशील देण्यात यावा , उपरोक्त अटींची पूर्तता  करीत असलेल्या  प्रशिक्षण  संस्थांनी  10 ते 19 सप्टेंबर 2015 या कालावधीत  प्रस्ताव  संत रोहीदास चर्मोद्योग  व चर्मकार  विकास महामंडळ  मर्यादीत जिल्हा कार्यालय  या ठिकाणी  सादर करावा . तसेच प्राप्त  झालेल्या  संस्थेच्या  प्रस्तावाची स्थळ पाहणी दि. 21 सप्टेंबर 2015 पर्यंत  जिल्हा व्यवस्थापक  करतील  व त्याचा अहवाल  प्रधान  कार्यालय  मुंबई येथे सादर करतील, असे व्यवस्थापकीय संचालक रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे .

 
Top