पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी (ता. बाशी) परिसरातील रूग्णांच्या सोईसाठी पांगरीत दहा एकर क्षेत्रात ऊभारलेले ग्रामिण रूग्णालयच सध्या सलाइनवर आहे. नेहमीप्रमाणेच मुदत संपल्यानंतर येथिल रूग्णालयात एकाही वैदयकिय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. वैदयकिय अधिक्षक, सहाय्यक अधिक्षक, वैदयकिय अधिका-यांसह पन्नास टक्के कर्मचा-यांच्या जागा रिक्त असल्यामुळे रूग्णांना अनंत अडचनींचा सामना करावा लागत आहे. रूग्णालयाच्या कारभारात सुधारणा करण्याची मागणी जोर धरत आहे. वैदयकिय अधिक्षक व वैदयकिय अधिका-यांविनाच येथिल कारभार गत अनेक महिन्यांपासुन राम भरोसे चालतो. ग्रामीण रूग्‍णालयात रूग्णांच्या सोइसाठी तीन वैदयकिय अधिका-यांची व्यवस्था शासनाने केलेली असुनही प्रत्यक्ष एकही अधिकारी या रूग्णालयात नाही. शालेय तपासणी अधिका-यांवरच येथिल रूग्णालयाचा कारभार सुरू आहे. गावातील रूग्णांसह बाहेरगावच्या रूग्णांनाही गैरसोईचा सामना करावा लागत आहे.
             पंधरा हजारांच्या पुढे लोकसंख्या असलेल्या व निमशहरी म्हणुन पांगरी परिचित आहे. पांगरी येथे असलेल्या या रूग्णालयात परिसरातील वाडया-वस्त्यासह उस्मानाबाद जिल्हयातील 50 ते 60 हजार रूग्णांवर विविध उपचार केले जातात. लोकांच्या मोफत सोइसाठी तत्कालीन पंचायत समिती सदस्य स्व. रघुनाथदादा पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून 1978 साली रूग्णालयाची उभारणी केली. सुमारे दहा एकर क्षेत्रात विस्तारलेल्या या रूग्‍णालयात समस्या मोठया प्रमाणात भेडसावत आहेत. एक वैद्यकिय अधिक्षक, तिन वैदयकिय अधिका-यासह 26 कर्मचारी वर्गाचा ताफा असलेल्या या रूग्णालयात दोन मोठया वार्डात तिस खाटा असुन मोफत औषधोपचार सुविधा उपलब्ध आहे. रूग्णालयाची इमारत अतिशय सुसज्ज अशी करण्यात आली आहे. ग्रामीण रूग्णालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत असलेले वैदयकिय अधिक्षकांचे पदच गत अनेक वर्षांपासुन रिक्त आहे. येथिल रूग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार हा बार्शीच्या ग्रामिण रूग्णालयाच्या अधिक्षकांकडे असुन त्यांच्याकडेच आणखी एका रूग्णालयाचा पदभार असल्यामुळे त्यांना कसरत करतच कारभार पहावा लागत असुन वैदयकिय अधिक्षकांचे पद तात्काळ भरण्याची मागणी होत आहे. पांगरी येथिल ग्रामिन रूग्णालयाकडे पाहण्याचा लोकांचा विचार बदलत असुन गत वर्षी या रूग्णालयात 32 हजार बाहयरूग्नांवर तर 2000 हजार आंतररूग्णांची तपासणी करून त्यांच्यावर ऊपचार करण्यात आल्याचे समजते. रूग्णालयात ब-याच शस्त्रक्रिया पार पडत असुन लवकरच येथे आधुनिक शस्त्रक्रिया विभाग व सोनोग्राफी मशिन आदी सर्व सुविधा या रूग्णालयात उपलब्ध होणार आहेत. रूग्णालय सुसज्ज असले तरी येथे कर्मचारी रिक्त असल्यामुळे हा दवाखाना शोभेचे बाहुले बनू पहात आहे. पांगरी ग्रामिण रूग्णालयात वैदयकिय अधिक्षक, एक वैदयकिय अधिकारी, तीन अधिपरिचारिका, सात एक्सरे टेक्निसियन, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक औषध निर्माता, एक प्रयोगशाळा सहाय्यक, एक कक्षसेवक, चार सफाइगार, दोन शिपाई, एक नेत्रचिकित्सा सहाय्यक, एक कनिष्ठ लिपिक, दोन सहाय्यक अधिक्षक असा पंचेविस कर्मचारी वर्गाचा ताफा मंजुर असुन यापैकी वैदयकिय अधिक्षक, सहाय्यक वैदयकिय अधिक्षक, वैदयकिय अधिकारी, तिन अधिपरीचारीका, एक कक्षसेवक, तिन सफाइ कामगार दोन अशा अकरा कर्मचा-यांच्या महत्वाच्या जागा रिक्त आहेत. 
तरी संबधित प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांनी या ग्रामिण रूग्णालयाच्या विविध समस्यांकडे लक्ष केंद्रित करून येथिल कर्मचा-यांच्या रिक्त जागा तात्काळ भरून रूग्णांची होत असलेली गैरसोय दुर करावी अशी पांगरी परिसरातील लोकांची मागणी आहे.
  रिक्त जांगांसंदर्भात शासनाकडे वारंवार मागणी करण्यात आलेली असुन पत्रव्यवहार सुरू आहे तरीही जागा भरन्यात अजुन यश आलेले नाही.
- भोपलकर मॅडम 
प्रभारी वैदयकिय अधिक्षक पांगरी
 
Top