नळदुर्ग -: श्री संत शिरोमणी संतसेना महाराज यांची पुण्‍यतिथी नळदुर्ग येथे विविध कार्यक्रमाने साजरी करण्‍यात आली. 
नळदुर्ग येथे श्री संतसेना नाभिक समाज मंडळाच्‍यावतीने अंबाबाई मंदीर सभागृहात संतसेना महाराजाच्‍या प्रतिमेचे पूजन मान्‍यवराचे हस्‍ते करण्‍यात आले. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी नळदुर्ग नगरपालिकेच्‍या नगराध्‍यक्षा सौ. मंगल उध्‍दव सुरवसे तर नळदुर्ग पोलीस ठाण्‍याचे सपोनि फुलचंद मेंगडे, उपनगराध्‍यथा लक्ष्‍मी खारवे, नगरसेवक कमलाकर चव्‍हाण, संजय बताले, नितीन कासार, पत्रकार शिवाजी नाईक, दिपक जगदाळे, धिमाजी घुगे, विनायक अहंकारी, मारूती बनसोडे, राजेंद्र रामभाऊ महाबोले, सुधीर हजारे, श्रमिक पोतदार, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नाभिक समाजाच्‍यावतीने निवृत्‍त डी.एन. कस्‍तुरे सह अन्‍य मान्‍यवरांचा सत्‍कार करण्‍यात आला. नळदुर्गसह येवती, खुदावाडी, लोहगाव, शहापूर येथील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्‍न झाला. दुस-या दिवचशी हभप आबासाहेब शिंदे महाराज यांचे काल्‍याचे किर्तन पार पडले. त्‍यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी नेताजी महाबोले, संदीप सुरवसे, मंदार महाबोले, बाबा काळे, आबा आगलावे, सुभाष महाबोले राम सोमवसे आदीनी परिश्रम घेतले.

 
Top