नळदुर्ग - पाठयपुस्तकातील आभ्साक्रमाबरोबर संगणकीय शिक्षण ही आज काळाची गरज बनली असुन स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यानी कास धरण्यासाठी संगणकाचा पुरेपुर उपयोग करण्याचे आवाहन वैष्णोदेवी दुग्ध प्रकल्पाचे रामकृष्ण गायकवाड यानी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना केले .
मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाचे औवचित्य साधुन आरबळी ता. तुळजापूर येथील जि.प. शाळेत वैष्णोदेवी प्रकल्प बाभळगाव यांच्यावतीने देण्यात आलेल्या संगणक व ई लर्निग साहित्याचे शुभांरभ्ा रामकृष्ण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी गायकवाड हे प्रमुख्ा पाहुणे म्हणुन बोलत होते. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संरपच बेबो मैनोद्दीन नदाफ तर वैष्णोदेवीचे नेताजी बडुरे , शालेय शिक्षण समितीचे दादा नवगिरे , सोसायटीचे चेअरमन अंकुश पवार, हे पुमुख आतिथी म्हणुन उपस्थित होते. प्रारंभी शाळेच्यावतीने मान्यवराचां सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन, प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक बाळासाहेब चिवडे यांनी केले .