उस्मानाबाद -: येथील व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्रामदिन भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अनार साळुंके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. प्रारंभी संस्थेचे सचिव ऍड.मिलिंद पाटील व श्री गोस्वामी यांच्या उपस्थितीत स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी भित्तीपत्रकांचे अनावरण तसेच विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकवलेल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आर्यचाणक्य विद्यालयाचे मुख्याध्यापक मनिष देशपांडे यांच्यासह व्यंकटेश महाजन विद्यालय, व्होकेशनल महाविद्यालय व आर्यचाणक्य उच्चमाध्यमिक, माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थीवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top