स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

उस्मानाबाद- जिल्ह्यातील राज्य स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतन ऑक्टोबर-2015 पासून उस्मानाबाद कोषागार कार्यालयामार्फत केले जाणार आहे.  जिल्ह्यातील ज्या स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांच्या वारसांनी निवृत्तीवेतन अथवा कुटुंबनिवृत्तीवेतनासाठी त्यांची ओळख पटविली नसेल त्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी कोषागार कार्यालयात येऊन  त्यांची ओळख पटविण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी विशाल पवार यांनी केले आहे.
या स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांच्या वारस पत्नी यांनी त्यांचेकडील मूळ दस्ताऐवजासह  (पीपीओ आदेश, सन्मानपत्र, ओळखपत्र आदी) सूचनापत्रासह कोषागार कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवृत्तीवेतन अथवा कुटुंबवेतन मिळण्यातील विलंब टाळण्यासाठी संबंधितांनी 30 सप्टेंबरपूर्वी कोणत्याही परिस्थितीत त्यांची ओळख पटविण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या कोषागार कार्यालयामार्फत आजपर्यंत 585 निवृत्तीवेतनधारकांची ओळख पटविण्याची कार्यवाही झाली असून  उर्वरित जवळपास 350 निवृत्तीवेतनधारकांनी त्यांची ओळख पटविण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्याबाबतचे आवाहन श्री. पवार यांनी केले आहे.                              
       भ्रष्टाचार  निर्मुलन समितीची  आज जिल्हास्तरीय बैठक

उस्मानाबाद-जिल्हास्तरीय  भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक दि. 22 सप्टेंबर 2015 रोजी दुपारी ठिक 3 वाजता  जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या  सभागृहात  ठेवण्यात आलेली आहे. सदर  दिवशी दुपारी 3 वाजल्यांनतर जनतेच्या तक्रारी किंवा अभिकथने पुराव्यासह ऐकूण  घेण्यात येतील. तरी सर्व कार्यालय प्रमुख तसेच अशासकीय सदस्य व जनतेने याची नोंद घ्यावी असे निवासी  उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे .

                                केरोसीनचे वेळेत वाटप करण्‍याचे आवाहन
         उस्मानाबाद,- :या जिल्ह्यास सप्टेंबर-2015 या महिन्यासाठी  केरोसीनचा कोटा प्राप्त झाला आहे. शिधापत्रिकाधक व परवानाधारकांना वेळेत केरोसीनचे वाटप करावेत व केरोसीन वितरणात कोणताही गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेऊन, विक्रेत्यांकडील शिल्लक साठयाची  माहिती दरमहा 27 तारखेपुर्वी न चुकता सादर करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. तहसीलदारांनी महिनाभरात कधीही दुकानात केरोसीन मिळेल, यादृष्टीने केरोसीन परवानाधारकांना कोटा उपलब्ध  करुन द्यावा. तसेच दरमहा तालुक्यातील संबधित गॅस एजन्सीकडून एक गॅसधारक/ दोन गॅसधारकांची यादी घेवून शिधापत्रिकेवर स्टॅंपिंग न करता किरकोळ परवानाधारकास कमी जास्ती नियतन देण्यात आल्यास त्यास सर्वस्वी तहसीलदार जबाबदार धरण्यात येईल.
            तसेच कंपनी एजटांनी तीन दिवसाच्या आत रक्कम अर्धघाऊक/किरकोळ परवानाधारकांकडून जमा करुन घेवून  केरोसीनचे वितरण करावे.  परवानाधारकांनी सदरची रक्कम कंपनी  एजंटाकडे  आदेश निघाल्यापासून तीन दिवसाच्या आत जमा करुन केरोसीनची मागणी करावी. केरोसीन कंपनी एजंटांनी कोटा तालुकानिहाय वाटप करीत असताना वाटपासाठी पाठविलेले टँकर प्रथम तहसील कार्यालयात  हजर करावे. टँकर ट्रकिंग सिस्टमनुसार तहसीलदार यांनी  निर्देश देतील त्याप्रमाणे तहसील कार्यालयाच्या प्रतिनिधी समक्ष केरोसीनचे वाटप करावे. केरोसीन वितरणाची कार्यवाही सायंकाळी 6 वाजेपर्यंत करावी. सुर्यास्तानंतर केरोसीनचे  वाटप करु नये. केरोसीन कंपनी, एजंट, अर्धघाऊक, किरकोळ विक्रेत्यांनी त्यांना देण्यात आलेला केरोसीन कोटा 25 तारखेपर्यंत 100 टक्के नियतन उचल करुन वाटपाची कार्यवाही पूर्ण करुन वाटपाचा पाक्षीक अहवाल दरमहा 17 व 27 ताररखेपुर्वी  सादर करावा. कोटा मुदतबाहय उचल केला जाणार नाही किंवा  व्यपगत होणार नाही, याची सर्व संबधितांनी दक्षता घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
 
       

 वाहन थांब्याबाबत  हरकती कळविण्याचे आवाहन

उस्मानाबाद, दि. 21:- पोलीस  अधिक्षक  उस्मानाबाद  यांच्या वतीने  कळविण्यात येते की , उस्मानाबाद व तुळजापूर  शहरामध्ये  लोकांच्या सोयीसाठी  व वाहतुक  सुरळीत  व्हावी यासाठी  विविध  ठिकाणी वाहन थांबे करण्यात येणार आहेत.  या थांब्याबाबत कोणास  काही सांगावयाचे  असल्यास त्यांनी 30 दिवसाच्या आत  शहर वाहतुक  शाखा  उस्मानाबाद  आणि पोलीस स्टेशन, तुळजापूर  येथे आपली  हरकत  नोंदवावी, असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
आसन क्षमता 3 + 1 असलेल्या ऑटोरिक्षांसाठी  रा.प.म. मध्यवर्ती  आगाराच्या डाव्या  बाजुला  10+ 10 रिक्षांसाठी जागा  निश्चित  करण्यात  आली आहे. आण्णाभाऊ साठे चौक  येथे दुधडेअरीला  लागून  असलेल्या मोकळ्या  जागेत  10 रिक्षांसाठी  जागा  निश्चित  करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयाच्या पाठभिंतीला मोकळया जागेत  10 रिक्षांसाठी,   बार्शी नाका (सिग्नल पाँईंट)  याठिकाणी 10 रिक्षांसाठी, उंबरे कोठा येथे पुर्वीच्या स्टँडसमोर  श्री राठोड  यांच्या घराशेजारी  5 रिक्षांसाठी, भाऊ उध्दवराव  पाटील शाळा, शाहुनगर, बार्शी रोडच्या जवळ मोकळया जागेत 5 रिक्षांसाठी, सेंट्रल बिल्डींग येथे रा.प.म.मध्यवर्ती  आगाराकडे जाताना  सिग्नलच्या  आधी डाव्या बाजुस 10 रिक्षांसाठी, समता नगर/ आनंद नगरच्या कॉर्नर  सोडून त्याच्या  बाजुला टी.व्ही. सेंटरच्या पाठभिंतीला जाणाऱ्या रोडवर 5 रिक्षांसाठी, शिवाजी चौक , तुळजापूरकडे जातांना 10 ऑटोरिक्षांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.
काळी पिवळी  जीप (5+1) आणि (6+1) ऑटोरिक्षा – सांजा रोड, दुरसंचार निगम  ऑफिसच्या समोर रोडला मोकळ्या जागेत  4 काळी पिवळी जीप  व 5 ऑटोरिक्षासाठी, बांधकाम  विभागाच्या मोकळया जागेत, शिवाजी चौक  येथे काळी पिवळीसाठी  स्टँड  निश्चित करता येऊ शकते, परंतु  यासाठी  सार्वजनिक  बांधकाम  विभागाने  सदर जागा  उपलब्ध  करुन देणे आवश्यक आहे,  औद्यौगिक  प्रशिक्षण संस्थेला लागून असलेल्या मोकळया जागेत 2 काळी पिवळी जीप व 4 ऑटोरिक्षा यांच्यासाठी, सेंट्रल बिल्डींगच्या डाव्या बाजुला  जिल्हा उद्योग  केंद्राच्या गेटसमोर  10 काळी पिवळी जीपसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.
  खाजगी व मालवाहतुक  वाहने पार्कींग- ज्या ठिकाणी  मालवाहतुक  वाहने थांबत  आहेत त्याठिकाणी  काळी पिवळी  जीप व 6+1 ऑटोरिक्षा  यांच्या थांब्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. मालवाहतुक  वाहनांसाठी  आठवडा  बाजार  येथे  पार्कींगसाठी जागा देता येईल  व ज्यादिवशी  बाजार असतो  त्यादिवशी सदर वाहने  जनावरांच्या  बाजारांच्या ठिकाणी  पार्कींग देता येईल, असे निश्चित करण्यात आली आहे.
तुळजापूर शहरातील  ऑटोरिक्षा व टॅक्सी  स्टॅड ठरविणे – 3+1 ऑटोरिक्षा – जुने बसस्टँडच्या प्रवेश  गेटजवळ 10 रिक्षा, जुन्या  बसस्टँडच्या बाहेर (आऊटगेटजवळ)  8 रिक्षा, मलबा  हॉस्पिटलजवळ  5 रिक्षा, घाटशिळ रोड-दिपक चौक 5 रिक्षांसाठी अशी जागा निश्चित करण्यात आली आहे.
6+1 ऑटोरिक्षा – सावरकर  चौक येथे 6+1 ऑटोरिक्षासाठी थांबा  देता येऊ शकतो, असे पोलीस विभागाने म्हटले आहे. याबाबतच्या हरकती 30 दिवसाच्या आत नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.  
                                                           
                     रेडीमेड गारमेंट व फॅशन डिझायनिंग   प्रशिक्षण

उस्मानाबाद,दि.21:- महाराष्ट्र ‌उद्योजकता विकास केंद्र, उस्मानाबाद आयोजित  विशेष घटक योजनेतील  सुशिक्षित बेरोजगार  महिला व  युवतीसाठी येथे मोफत रेडीमेड  गारमेंट ॲण्ड फॅशन डिझायनिंग  प्रशिक्षण दि.22 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर 2015 या कालावधीत अनाळा ता. परांडा व तामलवाडी ता. तुळजापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संपूर्ण रेडीमेड  गारमेंट  ॲण्ड फॅशन डिझायनिंग  व उद्योजकीय  अभ्यासक्रम या विषयी  11 ते 5 या वेळेत ‍तज्ञ  मार्गदर्शक व अधिकारी यांच्याद्वारे माहिती दिली जाणार आहे.  तरी इच्छुक महिला व युवतींनी अधिक माहिती व अर्जासाठी  दि. 21 सप्टेंबर 2015 पर्यंत कार्यक्रम समन्वयक संजय वैद्य भ्रमणध्वनी 9579362310 यांच्याशी  अनाळा, ग्रामपंचायत येथे संपर्क साधावा व प्रकाश पवार  कार्यक्रम समन्वयक तामलवाडी मोबाईल 8421664915 यांच्याशी ग्रामपंचायत  तामलवाडी  येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एमसीईडी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्ये केले आहे.
                                         
                       अन्न धान्य  व फळ प्रक्रीयेवर आधारीत  प्रशिक्षण

उस्मानाबाद,- महाराष्ट्र ‌उद्योजकता विकास केंद्र, उस्मानाबाद आयोजित   विशेष घटक योजनेतील  सुशिक्षित बेरोजगार  युवक व  युवतीसाठी येथे मोफत अन्नधान्य  व फळ प्रक्रीयेवर आधारित उद्योजकता  विकास प्रशिक्षण दि.24 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर 2015 या कालावधीत उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संपूर्ण अन्नधान्य व फळ प्रक्रीयेवर आधारित  उद्योगांसंबंधी , टमाटा सॉस , जाम जेली , केचप , ज्युसचे विविध प्रकार  , मसाले प्रक्रीया  उद्योगसंबंधी , सोया प्रक्रीया , आवळा प्रक्रीया  लोणचे  , मंचुरियन  , व्हेज, विविध प्रकार , पिझ्झाचे  विविध प्रकार , इटालियन  पास्ता  व स्पॅगेटीचे  विविध प्रकार  , सुप  विविध प्रकार,  प्रात्याक्षिके  व थेअरी  मार्गदर्शन  , खरेदी  विक्री  यांचे तंत्र  , उद्योजकीय  व्यक्तीमत्व  विकास ,   विविध  महामंडळ  कर्ज व अनुदान  विषयी  योजनांची  माहिती  दाळ प्रक्रीया  , पापड  प्रक्रीया  उद्योगसंधी ,  प्रकल्प  अहवाल   विक्री  कौशल्य  उद्योग  नोंदणी प्रकल्प  भेटी , कर्ज  प्रस्ताव  दाखल करण्या विषयी  माहिती  ,  अन्न भेसळ  व औषधी  संबंधी  कार्यालयाची माहिती , उद्योगाला लागणारे परवाणे , लोगो परवाना ख्‍आसएसआय ट्रेउ मार्क  संबंधी माहिती ,  एमआयडीसीमधील  भुखंड  , एसवएसआय रजीस्ट्रेशन  बँक  संबंधी  माहिती  , सुक्ष्म , लघु व मध्यम मंत्रालय भारत सरकार  यांच्या योजना , जिल्हा उद्योग केंद्र  व खादी  ग्रामोद्योगाच्या विविध योजना  यशस्वी  उद्योजक तज्ञ  मार्गदर्शक व अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत . तरी इच्छुक युवक व युवतींनी अधिक माहिती व अर्जासाठी  दि. 22 सप्टेंबर 2015 पर्यंत कार्यक्रम समन्वयक सुशांत  गायकवाड  भ्रमणध्वनी  9403866242  व 9209636789 यांच्याशी  महाराष्ट्र ‌उद्योजकता विकास केंद्र, उस्मानाबाद  येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी एमसीईडी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्ये केले आहे.

                    मेंढी व शेळीपालन प्रशिक्षण

             उस्मानाबाद,दि.18- मेंढी व शेळी  विकास  प्रक्षेत्र तीर्थ ता. तुळजापूर  जि. उस्मानाबाद  यांनी खाजगी  व्यवसाय  करणारे शेतकरी, सुशिक्षीत  बेरोजगार  यांना शेळी  पालन व्यवसाय  शेतीस  जोडधंदा  म्हणून  कसा करावा  व तो आजच्या परिस्थितीत  फायदेशीर  कसा ठरेल  या सर्व  विषयावर  मार्गदर्शन करण्याच्या हेतुने  मेंढी व शेळी विकास  प्रक्षेत्र तीर्थ  येथे तीन  दिवसाचे प्रशिक्षण शिबीर  आयोजीत केले आहे . या प्रशिक्षणामध्ये शेळी पालन  शेतीस  जोडधंदा शेळयांच्या पैदासी  करीत निवड , आहार , लक्ष ण व उपचार प्रतिबंधात्मक  उपाय , शेळी  पालन करतानाची  काळजी  , शेळयांची  निवड , जाती ,  करडाची निगा ,  मरतुकीची कारणे , विमा , विक्री व्यवस्थापन  इत्यादी विषयांवर  तज्ञांकडून मार्गदर्शन देण्यात येणार आहे व शेळीपालन प्रशिक्षणाचे  प्रमाणपत्र  देण्यात येईल , तेव्हा  या प्रशिक्षणात  भाग घेऊ  इच्छीणाऱ्यांनी  नाम मात्र  शुल्क  भरुन  आपले  पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी  विकास  प्रक्षेत्र  तीर्थ ता .तुळजापूर  फोन नं . 02472-2590266 येथे आपले  नाव नोंदवावे असे  लाखे  प्रक्षेत्र व्यवस्थापक  यांनी कळविले आहे.

अनुसुचित  जातीच्या  स्वयंसहायता  बचत गटांना 90 टक्केअनुदानावर  मिनी ट्रॅक्टर देण्याची योजना

उस्मानाबाद -महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या  दि. 6 डिसेंबर 2012 च्या शासन निर्णयानुसार अनुसुचित जाती  व नवबौध्द  घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर  मिनी ट्रॅक्टर  व त्यांची उपसाधने, कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर  इत्यादीचा  पुरवठा  करण्याची  योजना  कार्यान्वित झालेली आहे. सदर  योजनेसाठी अर्ज करणाऱ्या  स्वयंसहायता बचत  गटातील सर्व सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. एकूण सदस्यांपेैकी 80 टक्के सदस्य हे अनुसुचित  जातीचे  असणे आवश्यक आहे. सदर अटी पूर्ण  करणाऱ्या  स्वयंसहायता  बचत गटांना  मिनी ट्रॅक्टर  व इतर साहित्यासाठी  शासनाकडून  रु. 3 लाख 15 हजार  पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. उस्मानाबाद  जिल्ह्यासाठी शासनामार्फत  28 मिनी  ट्रॅक्टरचे  उद्दिष्ट ठरवून देण्यात  आलेले आहे. तेव्हा  सदर योजनेचा लाभ  घेण्यासाठी  उस्मानाबाद  जिल्हयातील अनुसुचित  जाती व नवबौध्द  घटकांच्या स्वंयंसहायता बचत गटांनी कार्यालयातील विहित नमुन्यातील अर्ज चेकलिस्ट प्रमाणे कागदपत्रांसह सादर करावेत . अर्जाची झेरॉक्स प्रत स्वीकारली जाणार नाही . अर्ज सादर  करण्याचा अंतिम दि. 25 सप्टेंबर 2015 पर्यंत राहील . योजनेच्या अधिक माहितीसाठी  कार्यालयास संपर्क साधावा  असे आवाहन  सहाय्यक आयुक्त  समाज कल्याण  उस्मानाबाद यांनी केले आहे.

            बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी आता आद्या आठवडी बाजार सुरु 

उस्मानाबाद- ग्रामीण  जीवन्नोनती  अभियानाअंतर्गत उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये महिला स्वयंसहायता समुहातील महिला काही वस्तुंचे उत्पादन करतात परंतु त्यांना फक्त प्रदर्शन महोत्सवामध्येच आपल्या उत्पादीत वस्तु विक्री  कराव्या लागतात.तसेच ग्रामीण भागात काही मेाजक्याच  ठिकाणी आठवडी बाजार भरतआहेत,त्यामुळे जी गावे बाजारावीना राहतात जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी  यांनी सुचवलेल्या नाविण्यापूर्ण उपक्रमामधून आठवडी  फिरता  बाजार हा उपक्रम जिल्हा ग्रामीण  विकास यंत्रणेमार्फत घेण्यात आला असून त्यासाठी जिल्ह्यात 56 ठिकाणी आद्या  आठवडी बाजार भरविण्याचे नियोजन करण्यात येत असून सध्या भूम तालुक्यातील जांब  या गावात  तसेच परांडा  तालुक्यातील शिराळा  या गावात  आठवडी बाजार भरविण्यात येत आहे . स्वयंसहायता  समुहाने जरी स्वत: उत्पादीत  केलेल्या  वस्तु विक्रीस  आणल्या नाहीत तरी त्या वस्तु ठोक बाजारातून  खरेदी  करुन आठवडी  बाजारात  विक्री करुन शकतात. आठवडी  बाजारात  विक्रीसाठी ठेवावयाच्या वस्तु, धान्य, भाजी ,फळे ,डाळी पापड , कपडा ,स्टेशनरी,खाद्य वस्तु इत्यादी असून या आठवडी  बाजारामुळे  महिला स्वयंसहायता समुहातील महिलांना त्यांनी उत्पादीत केलेल्या अथवा विकत घेउुन वस्तु विक्रीतनू  रोजगार  मिळू शकेल व महिलांना यामधुन  स्वयंसहायता समुहाच्या उत्पादीत  मालास बाजारपेठ  मिळून  महिलांना जाणे येणे  सोयीचे होऊ शकेल व महिलांचा वाहतुक खर्च  कमी होऊ शकतो व त्या  गावातील  लोकांना  गावातच  बाजारातील  वस्तु मिळाल्यामुळे त्यांचा  वेळ व आर्थिक बचत होऊ  शकते .  सध्या  शिराळा  व जांब या गावात भरत असलेल्या बाजारामुळे तेथील  महिलांना रोजगार उपलब्ध होऊ लागला  असून  जिल्ह्यातील  इतर गावामध्येही  लवकरच  बाजार  भरविण्याचे  नियेाजन करण्यात येत आहेत . तसेच आठवडी बाजरामध्ये स्वयंसहायता समुहाशिवाय इतर व्यापारीही येऊ शकतील त्यामुळे  स्वयंसहायता समुहाच्या वस्तु विक्रीमध्ये स्पर्धा राहील व वाजवी दर राहिल्यामुळे ग्रामस्थ  खरेदी  मोठया प्रमाणात  करतील , असे प्रकल्प संचालक  जिल्हा ग्रामीण  विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांनी कळविले आहे .
 
                       ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे आयोजन  

उस्मानाबाद - स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार  प्रशिक्षण  संस्था  व जिल्हा ग्रामीण  विकास यंत्रणा , उस्मानाबाद  यांच्या संयुक्त  विद्यमाने  ग्रामीण भागातील  दारिद्र्य रेषेखालील  18 ते 45 वयोगटातील  मुली व महिलांसाठी  दि. 22 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर 2015  या 30 दिवसांच्या कालावधीसाठी ब्युटी पार्लर या प्रशिक्षणाचे आयोजन  राजे कॉम्प्लेक्स , तिसरा मजला,औरंगाबाद रोड , उस्मानाबाद येथे करण्यात  आलेले आहे . सदर प्रशिक्षणाच्या  कालावधीत  स्टेशनरी, जेवणाची  व राहण्याची व्यवस्था संस्थेमार्फत  विनामुल्य  केलेली  असून कोर्स यशस्वीरित्या  पूर्ण  केल्यानंतर  तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरु  होईल  व स्वत:च्या पायावर उभे राहाल . तरी इच्छुक  मुली व महिलांनी  या सुवर्ण  संधीचा लाभ घ्यावा व स्वयंरोजगाराची निर्मिती  करुन स्वावलंबी व्हावे, असे आवाहन  संस्थेचे  संचालक राजन चुंबळे यांनी केले आहे. प्रवेशासाठी ग्रामसेवकाचा दारिद्र्‌य रेषेखालीलअसल्याचा दाखला , रेशनकार्ड किंवा रहिवाशी दाखला,वय व शैक्षणिक  पात्रतेसाठी  शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट , मार्कलिस्ट, पाच फोटो इत्यादी कागदपत्रांसह  व्यक्तीश: भेटावे  तसेच मोबाईल क्रमांक 9763624998 / 7030320255/ 9923069923/ 9552858521 वर संपर्क साधण्याचेही आवाहन केले आहे .                          

 
Top