पांगरी (गणेश गोडसे) उच्च प्रतिच्या गाडीतून विविध कंपनीच्या देशी,विदेशी दारूची वाहतूक करणार्‍या उस्मानाबाद जिल्ह्यातील तिघांना, वाहनासह साडेसात लाख रुपयांच्या  मालासह अटक केल्याची घटना  दि.21 सोमवारी रात्री 9.45 वाजता पांगरी-बार्शी दरम्यान असलेल्या कुसळंब टोल नाक्यांवर नाकाबंदी दरम्यान घडली.
      गणेश दत्तात्रय उर्फ दिनानाथ शेंडगे रा.भूम,जि.उस्मानाबाद,प्रविण गणपत डोके रा.गोलेगांव हल्ली शिवाजीनगर भूम,व रामलिंग शेकु पौळ रा.कसबा ता.भूम अशी पांगरी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नांवे आहेत.
   जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आदेशान्व्ये कुसळंब येथील टोल नाक्यालगत पांगरी पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली असून रात्री पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू असताना बार्शी येथून कुसळंब,येरमाळा मार्गे भूम कडे निघालेल्या एम.एच.25.आर.6056 या रेनोल्ड ड्स्टर या गाडीची तपासणी केली असता ऑफिसर्स चॉइस 240,व्हिस्की98,रॉयल स्ट्याग96,म्याकडॉल आदी विविध कंपन्यांचा देशी,विदेशी दारूचा साठा गाडीत मिळून आला.बेकायदा बिगर पासपरमिट आपल्या कब्जात दारूचा साठा बाळगल्याप्रकरणी तिघांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच गणेश शेंडगे यांच्यावर दारू पिऊन  गाडी भरधाव वेगात वेडी वाकडी चालवल्याप्रकरणी ड्रंक अँड ड्राईव्ह कलमाखालीही गुन्हा नोंद करण्यात आला आहे..आरोपी शिंगनापूर येथे दर्शन घेऊन बार्शी येथे आले होते.तेथे दारूची खरेदी करून येरमाळा येथे मित्राला सोडून भुमला जाणार होते.दरम्यान कुसळंब येथे ही पोलिस कारवाई झाली.  ही कारवाई पांगरी पोलिस ठाण्याचे स.पो.नि.सोमनाथ वाघ,पोलिस उपनिरीक्षक राजू राठोड,हवालदार अमोल अवघडे,मल्लिकार्जुन सोनकर,रवी लगदिवे,समिर शेख यांच्या पथकाने केली.अधिक तपास हवालदार सुधाकर ठाकर हे करत आहेत. 

 
Top