उस्‍मानाबाद -  उस्‍मानाबाद  तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या व सर्वाचे लक्ष वेधलेल्‍या  वडगाव सि. ग्रामपंचायतीवर अखेर शिवसेनेने आपला झेंडा फडकविला असून या ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अंकिता अंकुश मोरे तर उपसरपंचपदी अतुल रामेश्वर वाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
    दि. ४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत वडगाव सि. येथील गेल्या पंधरा वर्षापासून सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला धुळ चारुन अंकुश मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पॅनलने सर्वच्या सर्व म्हणजे ११ जागा व त्यासही २०० मताच्या परकारने जिंवूâन या ग्रामपंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकविला होता.
     
वडगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बोलावलेल्या नुतन ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत आज सरपंच पदासाठी अंकिता अंकुश मोरे तर उपसरपंच पदासाठी अतुल रामेश्वर वाडकर यांचेच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाNयांनी वडगाव सि. ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अंकिता अंकुश मोरे तर उपसरपंचपदी अतुल रामेश्वर वाडकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले.
ही निवड जाहिर होताच ग्रामपंचायत समोर जमलेल्या गावातील नागरिक, तरुण व शिवसैनिकांनी गुलालाची प्रचंड उधळण करीत व फटाक्याच्या आतीषबाजीत हा विजयी जल्लोष साजरा केला. नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत व ढोल ताश्यांच्या गजरात सरपंच, उपसरपंच तसेच नुतन सदसस्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील प्रत्येक चौकात नागरिकांनी या मिरवणुकीचे स्वगात केले.

 
Top