उस्मानाबाद - जिल्हा रुग्णालय उस्मानाबादच्या वतीने दि. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय वाशी ता. वाशी जि. उस्मानाबाद येथे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना व शेतकरी मानसिक समुपदेशन कार्यक्रम अंतर्गत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील शिबीरामध्ये बालरोग, शल्यचिकित्सा, अस्थीरोगतज्ज्ञ, कान नाक घसातज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, दंतरोगतज्ञ, मनोविकारतज्ञ व मानसोपचारतज्ञ सहभागी होऊन उपस्थितांची तपासणी मोफत करणार आहेत.
तसेच तपासणीतून आवश्यकता भासल्यास रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया किंवा उपचारासाठी संदर्भीत केले जाणार आहेत. तरी परिसरातील पिवळे, केशरी, अंत्योदय व अन्नपूर्ण शिधापत्रिकाधारक व शुभ्र शिधापत्रीकाधारक शेतकरी कुटुंबातील रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद व वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वाशी यांनी केले आहे