मंगळवेढा - अवैध गुटख्याच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मारुती इरटिका नेवून फसवणूक केल्या प्रकरणाच्या तपासाचा पोलिस अधिकारी बदलल्यामुळे तपासाला आता वेग आला असून नवीन तपास अधिकारी मंद्रूपचे पोलिस निरीक्षक विजय त्रिपुटे हे तपासासाठी मंगळवेढा पोलिस स्टेशन मध्ये ठाण  मांडून बसले आहेत.
                      तपास अधिकारी विजय त्रिपुटे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांचे जाब जबाब नोंदवून त्यांनी या आदि अजून कोठे कोठे खाजगी गाडी घेवून असे किती पराक्रम केले आहेत याचे ही जाब जबाबा नोंदविले तसेच त्या तिघा पोलिसांची ड्यूटी घटनेच्या दिवशी कोठे होती याचा ही तपास घेतला आहे.
दि.११ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वा.महिला पोलिस सोनाली इंगोले, पोलिस नाईक अमोल घोळवे,राहुल देवकते व अन्य एका इसमाने कर्नाटक राज्यातून गुटखा घेवून येणारा टेम्पो पकडण्यासाठी मारुती इरटिका क्रमांक एम.एच.१३. बी.एल. ००१४ ही नेवून तिचा अवैध कामासाठी गैरवापर करून फसवणूक केल्याची फिर्याद चालकाने दिल्यानंतर वरील तिघा पोलिसांवर व एक अज्ञात दाढीवाल्या इसमावर गुन्हा दाखल झाला आहे.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी काळे यांच्याकडे होता. पोलिस अधीक्षक विरेश प्रभू यांनी तपास संत गतीने होत असल्याने तपास मंद्रूप चे पोलिस निरीक्षक विजय त्रिपुटे यांच्याकडे दिला आहे. त्यांनी काल आणि आज दिवसभर या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी केली.पोलिसांचे हजेरी पत्रक तपासले त्यामध्ये कोणाची ड्यूटी कोठे होती याची माहिती त्यांनी जाणून घेतली. जुन्या लक्ष्मी पथकाने आज पर्यंत असे प्रकार कोठे कोठे व किती केले आहेत याचा जबाब गाडी चालकाकडून नोंदवून घेतले असल्याचे प्रतिनिधी यास बोलताना सांगण्यात आले.

 
Top