पिंपरी -   महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने रविवारी (दि.6 ) माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री राम शिंदे, कामगार मंत्री विजय देशमुख, लेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन,खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मन जगताप, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,  भाजपाचे मुबई अध्यक्ष आशिष शेलार यावेळी उपस्थित राहणार आहेत.

 चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी साडेनऊ वाजता हा मेळावा होणार आहे. यावेळी माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला सर्व माथाडी कामगारांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष रमेश चव्हाण यांनी केले आहे.

 
Top