यमगरवाडी -  निलंगा तालुक्यातील पानचिंचोली गावापासून 3 किमी अंतरावर गायरान क्र.2 वर मागील 24 वर्षापासून वडार समाजाची वस्ती आहे.दगड फोडून आपली उपजीविका भागवणारया अतिशय कष्टाळू समाजाला कामाच्या शोधात आठ दिवसाला गावे बदलावे लागतात.समाजाला मोठमोठ्या इमारती बांधून देणार्‍या या समाजबांधवांना मात्र दगडी खिळगे,पाल ठोकून रहावे लागत आहे. 24 वषर्ात यांना फक्त मतदानाचा अधिकार मिळाला.यावषी 20 घरकुल मंजुर झाली,तीही जागेच्या अभावी परत जायच्या मार्गावर
आहेत.
                    मागील 3 वषॆपासून भ.वि.वि.प्र.इथे पालावरची शाळा घेत आहे.34 मुले नियमीत शाळेत जात आहेत.शिक्षणाची जागृति होत आहे,तशी आरोग्याचीही डाॅ.नंदकुमार हाडगेकर इथे विनामूल्य आरोग्य सेवा देतात.पूवी इथे 3 महिन्याला आरोग्य शिबीर घ्यावे लागायचे,परंतु डाॅक्टरांच्या प्रयत्नाने बदल होत आहे.आज सरांनी स्वच्छतेविषयी व आजार होउच नये यासाठी घ्यावयाची काळजी याबद्दल मागॆदशॆन केले,गणेशाची आरती झाली व वस्ती समीतीही जाहीर झाली.

 
Top