पांगरी ( गणेश गोडसे )  पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त व जागा व वरिस्ट प्रशासणाचा आंधळा कारभार यावर 'पांगरी रुग्णालयाची व्यथा' अश्या ठळक मथळ्याखाली वृत्त मालिका प्रशिद्ध करून गांधारीचे सोंग घेतलेल्या अधिकार्‍यांना जागे करण्याचे काम केल्यामुळे पांगरिसह परिसरातील अनेक गांवामधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमधून संमाधान व्यक्त होत आहे. 
            रिक्त जागा भरण्यासाठी संबंधितांच्या प्रामाणिक प्रयत्नांची नितांत गरज आहे.किमान ग्रामीण भागातील आर्थिक दृस्त्या गरीब असलेल्या रुग्णांसाठी तरी रिक्त जागा भराव्यात असा सुर आहे.ग्रामीण रुग्णालयातील प्रश्नासंदर्भात कांही मान्यवरांच्या प्रतिक्रिया.
विजय गोडसे(सरपंच,पांगरी):ग्रामीण रुग्णालयातील रिक्त जागा भरून रुग्णांचि गैरसोय तात्काळ दूर करावी अशी मागणी पांगरी ग्रामपंचायतीने यापूर्वीच वारंवार केलेली आहे.मात्र तरीही प्रशासन दखल घेत नाही.
सोमनाथ वाघ(सहाय्यक पोलिस निरीक्षक,पांगरी पो.ठा): रिक्त जांगामुळे गुन्हेगारांची वैद्यकीय तपासणी,शवविछेदन,प्रथमोपचार आदि विविध अडचणी निर्माण होत आहेत.अगोदरच रिक्त जांगामुळे तारेवरची कसरत सुरू असताना सर्व वैद्यकीय सेवांसाठी सरळ बार्शीला जावे लागते त्यामुळे वेळ आर्थिक भुर्दंड पडत आहे.
डॉ.अरिफ शेख(आरोग्य कमिटी सदस्य,पांगरी): आयुष प्रोजेक्ट मधून बिएएमएस,बिएचएमएस,बियूएमएस स्थानिक डॉक्टरांची भरती करावी अथवा सुसज्ज रुग्णालय सामाजिक संवस्थेस चालवण्यास द्यावे.वेद्यकीय अधिक्षकांचे पद तात्काळ भरून त्यांना रहाणे बंधनकारक करावे.
सुहास देशमुख(तंटामुक्ती अध्यक्ष,पांगरी): कधीकाळी राज्यस्तरीय आदर्श ग्रामीण रुग्णालयाचा पुरस्कार प्राप्त असलेल्या या रुग्णालयातील रिक्त जागा तात्काळ भरून रुग्णांची गैरसोय दूर करून त्यांना सहन करावी लागणारी आर्थिक झळ बंद करावी.
 सुनील गाढवे(अध्यक्ष तालुका राष्टवादी युवक कॉंग्रेस): रिक्त जागा तत्काळ भरण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारवा लागेल.
बाबा जाधव: पांगरी परिसरातील पंधरा ते विस गांवामधील रुग्णांचा विचार करून रिक्त जागा प्राधान्याने भरणे गरजेचे आहे.त्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे॰
चौकट: संतोष जोगदंड(तालुका आरोग्य अधिकारी,बार्शी): रिक्त जागा भरण्यांचा अधिकार आरोग्य उपसंचालक यांना असून बैठकीत पांगरीतील रिक्त जागा भरण्याबाबत वारंवार मागणी करून तसे कळवलेले आहे.तसेच बोगस डॉक्टरवर लवकरच कठोर कारवाई करू असे पुढारी प्रतींनीधिशी बोलताना सांगितले.

 
Top