नळदुर्ग - गणेशोत्‍सवा निमित्‍त नळदुर्ग येथील महाराणा प्रताप गणेश मंडळाच्‍यावतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले आहे. 
शनिवार रोजी मंडळाच्‍यावतीने एकदिवशीय जनावरासाठी चारा छावणी उघडण्‍यात आली . पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकुर, शहरप्रमुख संतोष पुदाले, उद्योगपती मनिष हजारे ,  प्रमुख उपस्थितीत चारा छावणीचा शुभांरभ करण्‍यात आला. यावेळी मंडळाचे मंगेश चंदेले, अजय चंदेले, सुजित हजारे, सुधिर हजारे ,राहुल हजारे यांच्‍यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
        दि. 21 सप्‍टेंबर सोमवार रोजी मुकबधिर शाळेतील विद्यार्थ्‍याना खावु वाटप , मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता पोता उडी, बकेट बॉल , संगीत खुर्ची , धावण्‍याची स्‍पर्धा होणार आहेत. सांयकाळी गणेशोत्‍सव व राष्‍ट्रीय एकात्‍मता  या विषयावर विनायक अंहकारी यांचे व्‍याख्‍यान होणार आहे. बुधवार रोजी रांगोळी स्‍पर्धा, हस्‍ताक्षर , वक्‍तृत्‍व  व फॅन्‍सी ड्रेस , डान्‍स अशा विविधा स्‍पर्धा होणार असुन यांच दिवशी  विजेत्‍याना परितोषिक देण्‍यात येणार आहे. बक्षिस वितरण कार्यक्रमास नगराध्‍यक्ष मंगल सुरवसे, उपनगराध्‍यक्ष लक्ष्‍मी खारवे, शिवसेनेचे युवा नेते तथा माजी जि. प. सदस्‍य गणेश सोनटक्‍के , नगरसेवक नितिन कासार ,संजय बताले ,कमलाकर चव्‍हाण ,यांची प्रमुख उपस्थ्ति  राहणार आहे.  सर्व कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी मंडळाचे अध्‍यक्ष राहुल हजारे, अजय ठाकुर, शुभम हजारे, अभिजीत चंदेले, अजित हजारे, मंगेश चंदेले, अभिजीत ठाकुर, संतोष गहेरवार, विशाल चंदेले, अतुल हजारे, जगदिश गहेरवार दिनेश हजारे , सागर हजारे यानी पुढाकार घेतले आहे. 

 
Top