मुंबई : क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने दुष्काळग्रस्तांना पाच लाखांची मदत केली आहे. अजिंक्य रहाणेने पाच लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला. सोमवारी सकाळी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीत अजिंक्यने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत दिली.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी पुढाकार घेतल्यानंतर अजुन एक मराठमोळं नाव या यादीत जोडलं गेलं आहे. मुंबईकर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने दुष्काळग्रस्तांना पाच लाखांची मदत केली आहे.
एकीकडे मराठी कलाकार वगळता दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी इतर क्षेत्रातून फारसं कोणी पुढे येत नसताना मराठमोळ्या अजिंक्यने सामाजिक जबाबदारीचं भान ठेऊन केलेली मदत नक्कीच प्रशंसनीय आहे.
