उस्‍मानाबाद -   रोटरी क्लबच्या वतीने  वडगाव सि. ता. उस्‍मानाबाद  येथे  घेण्यात
आलेल्या तपासणीनेत्र चिकित्सा शिबीरात १६८ रुग्णांच्या डोळ्यांच्या  करुन त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
  शनिवार रोजी  सकाळी डॉ. गोविंद कोकाटे यांनी एका रुग्णांच्या डोळ्याची तपासणी करुन या शिबीराचे उद्घाटन केले. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष पी. आर. काळे, सचिव अविनाश काळे, उद्योजक सुनिल गर्जे, रोटरी नेत्रालयचे सचिव दंडवते व याच नेत्रालयातील इसाके यांच्यासह अंकुश मोरे, माजी सरपंच रमेश कोरडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. ज्या रुग्णांच्या डोळ्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. अशा रुग्णांच्या रोटरी क्लबच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया करुन देण्यात येतील अशी ग्वाही रोटरीचे अध्यक्ष प्रविण काळे यांनी यावेळी बोलताना दिली.
आज नेत्रतपासणी झालेल्या १६८ रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांना औषधाचे वाटप जागेवरच करण्यात आले. तर १८ रुग्णांना जष्मे देण्यात येणार असून १३ रुग्णांच्या डोळ्यावर मोतीबींदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी गावचे उपसरपंच अतुल वाडकर, माजी पं.स. सदस्य उत्तम कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री सुरेश जानराव, लक्ष्मीकांत हजारे, बळी कांबळे, जयराम मोरे यांच्यासह मधुकर मुळे, आण्णा पांढरे, बाळासाहेब म्हत्रे, काकासाहेब म्हेत्रे, रामेश्वर वाडकर, धोंडीराम जाधव, सुरेश वाडकर, राकेश कुलकर्णी आदीसह गावातील प्रतिष्ठीत नागरीक व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top