उस्मानाबाद - तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे तुळजापूरकडे येणाऱ्या विविध मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गांने वळविण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी यासंदर्भातील आदेश नुकतेच जाहीर केले आहेत. येत्या 11 ऑक्टोबर ते 27 आक्टोबरपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत.
           या कालावधीत तुळजापूर-सोलापूर ये-जा करणारी वाहने मंगरुळ पाटी, इटकळमार्गे ये-जा करतील. उस्मानाबाद-सोलापूर ही वाहतूक वैरागमार्गे होईल. उस्मानाबाद-हैद्राबाद मार्गावरील वाहने औसा, उमरगा, हैद्राबादमार्गे ये-जा करतील. सोलापूर-औरंगाबाद या मार्गावरील वाहने बार्शी, येरमाळा मार्गे ये-जा करतील. बार्शी-तुळजापूर - या मार्गावर केवळ एकेरी वाहतूक सुरु राहील. तुळजापूरहून वाहने बार्शीला जाऊ शकतील. मात्र बार्शीहून तुळजापूरकडे येणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. हैद्राबाद-औरंगाबाद या मार्गावर ये-जा करणारी वाहने उमरगा चौरस्ता, औसा, लातूर, अंबेजोगाई, मांजरसुंबा मार्गे ये-जा करतील. लातूर-सोलापूर मार्गे ये-जा करणारी वाहने मुरुड, ढोकी, येडशी, बार्शी मार्गे सोलापूर ये-जा करतील. 
           या बदलातून  एस.टी. बसेसना वगळण्यात आले आहे. तुळजापूर ते सोलापूर या मार्गाने ये-जा करणाऱ्या एस.टी. बसेस मंगरुळ पाटी, इटकळ मार्गे ये-जा करतील. सर्व प्रकारची शासकीय वाहने, महत्वाच्या, अतिमहत्वाच्या व्यक्तींची वाहने सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवांसाठींची वाहने यांना या बदलातून वगळण्यात आले आहे.                


 
Top