उस्मानाबाद  - तुळजापूर येथील श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत भाविकांची गर्दी लक्षात घेऊन नियंत्रण कक्ष, स्वतंत्र बस स्थानके, कर्नाटक राज्यांच्या मार्गावरील जादा वाहतूक, फलकाद्वारे प्रसिध्दी, बसेसची उपलब्धता व नियमितता, लॉक रुम,  क्रेन,  बसेसची उपलब्धता, आंतरराज्य बसेस, आपत्ती व्यवस्थापन अशी अनेकविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची ‍माहिती उस्मानाबाद राज्य परिवहन  महामंडळाचे विभाग नियंत्रक  यांनी दिली आहे. या संदर्भात श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा  जिल्हाधिकारी  डॉ.प्रशांत नारनवरे यांनी बैठक घेऊन   संबंधितांनी ‍भाविकांना  सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले होते. 
            या कालावधीत नवीन व जुन्या बस स्थानकावरील वाहतूक नियंत्रण कक्ष, जादा वाहतूकीसाठी स्वतंत्रनियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहे. घटस्थापना व दसरा या कालावधीसाठी नवीन बस स्थानकावर कर्नाटक राज्यासाठीच्या व  सोलापूर-उस्मानाबाद मार्गावरील जादा वाहतूकीसाठी जुन्या बसस्थानकावर स्वतंत्र नियंत्रण कक्षाद्वारे नियोजन करण्यात येणार आहे.अश्वीनी  पौर्णीमा कालावधीतील जादा वाहतूकीसाठी सोलापूर मार्गासाठी तुळजापूर आगारातील स्वतंत्र वाहतूक केंद्राद्वारे तसेच जुन्या बस स्थानकावरुन उस्मानाबाद, बार्शी मार्गावरील जादा वाहतूकीचे नियोजन करण्यात येणार असून नेहमीप्रमाणे इतर मार्गावरील वाहतूक नवीन बस स्थानकावरुन होणार असल्याचेही नमूद केले आहे. या कालावधीत बसेस वाहतूकीची कोंडी होऊ नये यासाठी नळदुर्ग मार्गे ऐवजी लोहारा, नारंगवाडी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
           बसस्थानकातील गुलबर्गा, हुमनाबाद,सोलापूर आदी बसस्थानकाबाबत माहिती,  वाहनतळांबाबत माहिती स्वतंत्र फलकाद्वारे करण्याबाबतचे नियोजन आहे. तसेच सर्व बसेस नियमित धावतील याची दक्षता घेण्यात येत असून भाविकांना बसेस कमी पडणार नाही यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच वाहन रस्त्यावर उभे राहणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत सर्व चालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. 
         भाविक बसच्या टपावर बसणार नाहीत याबाबत सर्व चालक वाहकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बसच्या वेगावर नियंत्रण ठेवून ‍भाविकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी सूचनाही देण्यात आल्या आहेत. यात्रा कालावधीमध्ये इतर विभागाकडून क्रेन उपलब्ध करण्याबाबतची कार्यवाही करण्यात आली आहे.
            यात्रा कालावधीमध्ये घटस्थापना ते दसरा या सत्रात या विभागाच्या बसेससोबत इतर विभागाच्या बसेसही उपलब्ध होणार आहे. यामुळे भाविकांची सोय होणार आहे. 
      या  शिवाय यात्रा वाहतूकीमध्ये प्रामुख्याने कर्नाटक राज्यातील बीदर व गुलबर्गा विभागाच्या बसेस आंतरराज्य मार्गावर वाहतूक करतात.  दरदिवशी अंदाज 50  पेक्षा जास्त संख्येने बसेस या आंतरराज्य मार्गावर धावतात. तसेच आपत्ती व्यवस्थान ‍विभागाकडून सूची प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही  माहिती विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, उस्मानाबाद यांच्याकडून देण्यात आली आहे.   

 
Top