तुळजापूर :- विधानसभा मतदार संघाच्‍या शेवटच्‍या घटकापर्यंत सर्व योजना पोहोचवण्‍यासाठी प्रयत्‍नांची पराकाष्‍टा करु, असे प्रतिपादान आ. मधुकरराव चव्‍हाण यांनी केले.
            गंधोरा (ता. तुळजापूर) येथे नवीन शिधापत्रिका वाटप कार्यक्रमात आ. चव्‍हाण हे बोलत होते.  यावेळी पुढे बोलताना आ. चव्‍हाण म्‍हणाले की, गंधोरा गावाचा सर्वांगिण विकास करण्‍यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून सर्व समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी पाठपुरावा करावा. त्‍यांना संपूर्णपणे सहकार्य केले जाईल. गंधोरा येथील प्राधल्‍पक्रम घटकातील 335, अंत्‍योदयचे 66 शेतकरी कुंटुंबातील 115 अशा एकूण 516 कुटुंबांना अन्‍नसुरक्षेचा लाभ देण्‍यात येत असून 19 वंचित कुंटुंबासाठी शासनाकडे पाठकरीत असल्‍याचे ते म्हणाले.
             यावेळी तहसिलदार काशिनाथ पाटील, पं.स. सभापती प्रकाश चव्‍हाण, माजी उपसभापती साधू मुळे, आनंदा भोसले, सरपंच प्रकाश भोसले, उपसरपंच श्रीराम राठोड, तंटामुक्‍तीचे अध्‍यक्ष संतोष मुसळे आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक नायब तहसिलदार राजेश जाधव यांनी केले तर जि.प. अध्‍यक्ष अॅड. धिरज पाटील यांनी मार्गदर्शन केले.
 
Top