उस्मानाबाद :- सैन्यभरती ऑनलाईन रजिस्ट्रेशन बाबत नुकतीच निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मेजर सुभास सासने, जिल्हा सैनिक कल्याण,उस्मानाबाद यांनी ऑनलाईन सैन्य भरती प्रक्रीयेबाबत उपस्थिताना पॉवर पॉईट प्रजेंटेंशन द्वारे सविस्तर महिती दिली. या बैठकीसाठी विविध तालुक्यातील तहसिलदार व कर्मचारी उपस्थित होते. सैन्य भरती ऑनलाईन प्रक्रीयेबाबत अधिक माहिती करिता मेजर सुभास सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उस्मानाबाद यांचेशी दुरध्वनी क्रमांक 222557 व 9970856438 वर सर्पक साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे.   
 
Top