येथील अॅड. शशिकांत निंबाळकर यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत भैय्यु महाराज बोलत होते. याप्रसंगी सोनारीच्या भैरवनाथ मंदिराचे पुजारी संजय महाराज तसेच शशिकांत निंबाळकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना भैय्यु महाराज म्हणाले की, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियाना आपण रोख स्वरुपात मदत दिली तर कर्जदार लगेच त्यांच्या दारात हजर होतो. त्यामुळे या मदतीचा म्हणावा तसा उपयोग या कुटूंबियास होत नाही. त्यामुळे या कुटूंबियाचे खNया अर्थाने कल्याण करावयाचे असेल तर त्यांचा स्वाभिमान जागृत ठेवून त्यांना स्वावलंबी बनविले पाहिजे. ही आपली भुमिका असल्याचे स्पष्ट करुन धाराशिव जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियाच्या २१ वारसास त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे विविध वंâपन्यामध्ये आपण नौकरी लावून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा आत्महत्याग्रस्त कुटूंबियाच्या वारसास वंâपनीत सामावून घेण्याबद्दल कंपनीनी चर्चा झाली असून आपण अशा मुलांना कंपनीत नेवून नौक-या दिल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील आपल्या दोन दिवसाच्या दौ-याचा आढावा घेवून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियाशी थेट संवाद साधल्याचे सांगून आत्महत्या हा कांही मार्ग नाही. तेव्हा हिम्मत न हारता प्रसंगाला सामोरे जा आम्ही सर्व जण तुमच्या बरोबर आहोत असा दिलासा आपण या कुटूंबियाना दिल्याचे त्यांनी सांगितले. सुर्योदय परिवाराच्या वतीने दुष्काळावर मात करण्यासाठी ज्या कांही योजना राबविण्यात येत आहेत. त्याचाही त्यांनी याप्रसंगी आढावा घेतला. कारण शेतकरी स्वयंभू झाला तरच समाजाचे प्रश्न सुटणार आहेत. त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी आमच्या संस्थेला मदत करता येईल त्या त्या ठिकाणी आम्ही मदत करणार असल्याचे सांगून, तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ हे गाव आदर्श बनविण्यासाठी आपण दत्तक घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.