तुळजापूर :- शारदीय नवरात्र महोत्सव व कोजागिरी पोर्णिमा निमित्त सोलापूर जिल्हा व शेजारील राज्यातून भाविक पायी चालत येत असतात. या भाविकांच्या मांदियाळीने संपूर्ण तुळजापूर-सोलापूर रस्ता फुलून गेल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. या लाखो भाविकांनी  तुळजापुरात पायी चालत येऊन श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन आनंद उत्साहच साजरा केल्याचे चित्र दिसून येत होते. भाविकांमधील उत्साह कौतूकास्पद होता आणि प्रत्येक भाविक आपण तुळजापूरात देवीच्या दर्शनासाठी पायी चालत आल्याचा आनंद प्रत्येक भाविकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. यावेळी प्रशासनाकडून मुख दर्शन, धर्मदर्शन आणि शिखर दर्शनाची स्वतंत्र रांगेत सोय करण्यात आल्याने भाविकांचे दर्शन सुलभ होत असल्याचे पाहायला मिळाले. सोलापूरसह विजापूर, इंडी यासह कर्नाटक राज्याच्या विविध भागातील भाविक श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुराकडे येत असल्याचे चित्र होते. युवा वर्ग, महिला याबरोबरच काही वृद्ध भाविकही पायी चालत येताना दिसत होते. 
उद्या (दि.27 रोजी) मंदिर पौर्णिमा व श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पुजा आणि रात्रौ सोलापूरच्या काठयासह छबीना होणार आहे.                       
 
Top