उस्मानाबाद - राज्यातील रद्द/व्यपगत ऑटोरीक्षा परवान्याचे नुतनीकरण करण्यासाठी शासनाने 16 नोंव्हेबर पर्यत मुदत वाढ देण्यात आली असून ही अंतिम मुदत दिली आहे. जिल्ह्यात ऑटोरिक्षा परवान्याची संख्या एकूण-2016 आहे. 16नोंव्हेबरपर्यत ऑटोरिक्षा परवाना नुतनीकरण करून घ्यावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
सदरील परवाने मुदतीत नुतनीकरण न केल्यास मोटार वाहन कायदा 1988 मधील तरतुदीनुसार परवाने कायम स्वरूपी रद्द करण्यात येतील. याबाबत कार्यालयाने परवाने तसेच योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण न केलेल्या वाहनांची कागदपत्रे तपासणी मोहिम सुरू करण्यात आली असून दोषी वाहनांवर योग्य ती कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे.