उस्मानाबाद : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या एकता दौडचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी साहेबराव घुगे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. यावेळी तहसीलदार सुभाष काकडे, नायब तहसीलदार राजेश जाधव, जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे, नितीन तावडे, विष्णू इंगळे, पत्रकार मोतीचंद बेदमुथा, संतोष जाधव आदी उपस्थित होते.