तुळजापूर   - शारदीय नवरात्र महोत्सवात  मंगळवार आठव्या दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. 
    राज्य व परराज्यातील चालत येणा-या  भाविकांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर संस्थानने वेळेवर सर्वांना दर्शन मिळावे यासाठी गर्दीचे नियंत्रण करुन दर्शनरांग नियंत्रित केली. या शिस्तबद्धतेमुळे भाविकांना कोणताही त्रास न  होता चांगल्या पद्धतीने दर्शन घेता आले. 
श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार  अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्म रक्षणासाठी श्री तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन आपल्या हाताने भवानी तलवार देऊन आर्शीर्वाद दिला म्हणून या दिवशी श्रींस महाअलंकार घालण्यात येऊन छत्रपती भवानी तलवार देत आहे, ही अवतार पूजा मांडण्यात येते.  दरम्यान, काल रात्री श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.  यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उद्या (दि. 21 रोजी) श्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. 

 
Top