उस्मानाबाद - भारतीय सैन्यदलात व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एस.एस.बी. प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आलेला आहे. सदरच्या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण मिळणार आहे.
कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस या परिक्षेत उर्त्तीण झालेल्या व स्पेशल एंट्री द्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तसेच ज्या महाराष्ट्रीयन नवयुवक/युवतींना सशत्र सैन्यदलाकडून एस. एस. बी. परिक्षेची मुलाखत पत्रे मिळाली आहेत, अशा उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीच्या पुर्वतयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण क्रेंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर नाशिक रोड, नाशिक येथे वर्ग चालविण्यात येणार आहेत. प्रशिक्षण कोर्सचा कालावधी दि.27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर (एकूण10 दिवस) असा आहे. प्रशिक्षणकालावधीत निवासची, प्रशिक्षणाची व भोजनाची सोय विनामुल्य करण्यात आली आहे.
तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी दि. 19 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कार्यालय,उस्मानाबाद येथे खालील प्रमाणे पात्रता धारण करीत असतील अशाच उमेदवारांनी शैक्षणीक प्रमाणपत्र व गुणपत्रिका मुळ प्रतीसह मुलाखतीस हजर राहावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रं.02427-222557 वर संपर्क साधावा. एस. एस.बी.च्या वर्गासाठी खालील प्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व हृया सबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला घेउन येणेआवश्याक आहे. कंबाईन्ड डिफेंन्स सर्विसेस एक्झीमिनेशन अथवा नॅशनल डिफेंस ॲकडमी एक्झीमिनेशन उत्तीर्ण असावे व त्यासठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एन.सी.सी.सर्टिफिकेट ए,बी ग्रेड मध्ये पास झालेले असावे व एन.सी.सी ग्रुप हेडक्वार्टने एस.एस.बी.साठी शिफारस केलली असावी.टेक्नीकल र्गॅज्यूएट कोर्ससाठी एस.एस.बी.मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.युनिव्हर्सिटी एर्न्टी स्किमसाठी एस.एस.बी कॉल आलेले असावे अथवा एस.एस.बी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. तरी वरील प्रशिक्षण वर्गाचा जास्तीत जास्त पात्र महाराष्ट्रीयन तरूण/तरूणींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, (नि) सुभाष सासने,यांनी एका पत्रकान्वये केले आहे.