नळदुर्ग - येथिल आपलं घर प्रकल्प सभागृहात परिवर्तन सामाजिक संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा लक्ष्मी मारूती खारवे, तर पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे , नगरसेवक कमलाकर चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना गायकवाड , परिवर्तनचे अध्यक्ष बाबासाहेब वडवे, बोरगांवचे संरपंच राजशेखर कलशेटटी, उपसंरपच लक्षमण पाटील, बसवंत मुळे, सिंदगावचे उपसंरपच विवेकानंद मेलगिरी, आदि उपस्थित होते.
यावेळी एकुण अठरा मान्यवराना उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव मारूती बनसोडे यानी तर सुत्रसंचालन एस. के . गायकवाड व दादासाहेब बनसोडे यांनी आभार मानले.