उस्मानाबाद - जिल्हृयात तुर,कापूस किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प सन 2015-16 अंर्तगत केलेल्या निरिक्षणावरून सध्या तुर पिकावर काही ठिकाणी पाने गुंडाळणरी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून कापूस पिकावरील रसशेाषन करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.किडीच्या नियंत्रणासाठी पुढील प्रमाणे योजना सुचविण्यात येत आहे.
तुर-पिकावरील शेंगा पोखरणारी (हेलिकोवर्पा)अळीच्या नियंत्रणासठी क्लोरपायरीफॉस 20 ईसी 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 2 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे.फुलोऱ्यामधील तुरीसाठी निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एच.एन.पी.व्ही.500मिली या प्रमाणे फवारणी करावी.
कापुस-पिकावरील रस शोषणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी डायफेनथ्युरॉन 50 डब्लू पी 1.2 ग्राम किंवा ब्रुप्रोफेझीन 25 एस सी 1 ग्राम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे.सदरील किटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी किटक-नाशकाची मात्रा 3 पट करावी.पाने लाल पडल्यास माग्रोसियम सल्फेट 1 टक्का किंवा युरिया 2 टक्के ची फवारणी करावी.असे आवाहन उपविभागिय कृषी अधिकारी केले आहे.