पांगरी (गणेश गोडसे) :- रोजगार हमी योजनेतील बंद केलेले काम तात्‍काळ पूर्ववत सुरू करावे अन्यथा सहा ओक्टोंबर पासून चारे (ता.बार्शी)येथील  ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा ईशारा मजूर व त्यांच्या कुटुंबियांनी एका लेखी निवेदनाद्वारे बार्शीच्या तहसीलदारांना दिला आहे.
   प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,चारे येथील नोंदणीकृत मजुरांनी दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे जुलै 2015 मध्ये लेखी अर्जाद्वारे रोजगार हमी योजनेतून कामे सुरू करण्याची मागणी केली होती.त्या मागणी नुसार बार्शी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी दि.12.8.15 रोजी तसा आदेश चारे ग्रामपंचायतीस दिला होता.त्या आदेशा नुसार तत्काळ दि.20 रोजी प्रत्यक्ष कामही सुरू करण्यात आले होते.मात्र सादर चालू काम दि.10 सप्टेंबर पासून मजुरांना कोणतीही पूर्व सूचना न देता बंद केलेले आहे.सदर बंद केलेले काम पुन्हा सुरू करावे असा विनंती अर्ज 14 सप्टेंबर रोजी देण्यात आला आहे.मात्र अर्ज देऊन ब-याच दिवसांचा कालावधी उलटून जावूनही अद्यापही त्या अर्जाची दखल घेण्यात आलेली नाही.
      रोजगार हमी कामे बंद असल्यामुळे रोजनदारीवर आपली उपजीविका करणार्‍या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.तरी संबंधित वरिष्ठ प्रशासनाणे मजुरांच्या या मागणीचा विचार करून 5 ओक्टोंबर पर्यन्त बंद केलेली कामे पूर्ववत सुरू करावीत अन्यथा 6 ओक्टोंबर रोजी ग्राम पंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याची ईशारा मजुरांनी लेखी निवेदनात दिला आहे.निवेदनावर विलास गोविंद जगदाळे यांच्यासह मजुरांच्या सह्या आहेत.निवेदनाच्या प्रती जिल्हा अधिकारी,मुख्य सचिव मुंबई,गट विकास अधिकारी,बार्शी,पांगरी पोलिस ठाणे आदींना देण्यात आल्या आहेत.
 
Top