पांगरी (गणेश गोडसे) :- हिंसेचा धर्म स्वीकारलेल्या भटक्या समाजातील पारधी मुले अहिंसेच्या मार्गाने शिक्षणाचे अमृत घेण्याचा प्रयत्न करत आहेत ही बाब राष्ट्रपति महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने समता, बंधुता, अहिंसा व प्रभावी शिक्षण देण्याचा योग साधून आला असल्याचे प्रतिपादन प्रा.विशाल गरड यांनी केले. ते खांडवी ता.बार्शी येथे न्यु इरा पब्लिक स्कूल या समाजातील वंचित,दुर्लक्षित पारधी मुलांसाठी अजित फौंडेशन यांच्यावतीने चालवण्यात येत असलेल्या शाळेत महात्मा गांधी जयंतिंनिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ,वाटप करतेवेळी संवाद साधताना बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई पन्नालाल सुराणा,अजित फौंडेशनचे अध्यक्ष महेश निंबाळकर,सुधीर खाडे,हनुमंत हिप्परकर,रमेश कास्वटे,विनया जाधव,अर्चना राऊत,कुलभूषण क्षीरसागर,प्रमोद बारंगुळे,शंकर गव्हाने  आदी मान्यवर उपस्थित होते.
     येथील प्रशाळेच्या वतीने समाजातील शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेल्या व ज्यांची शिक्षण घेण्याची ताकद नाही अश्या दुर्लक्षित मुलाना या शाळेत न्याय देण्याचे काम केले जाते.शाळा लहान असली तरी उच्च विचाराचे शिक्षण देण्याचा प्रयत्न होतो.भविष्याचा वेध घेत असताना वर्तमानात उत्तम कार्य करा,असे सांगून विद्यार्थ्यांना गोष्टी सांगून गप्पा मारत ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.प्रास्ताविक महेश निंबाळकर यांनी तर आभार विनया जाधव यांनी मानले.कार्यक्रमाच्या याश्वितेसाठी प्रशाळेतील सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले.
 
Top