उस्मानाबाद - जिल्हृयातील माजी सैनिकांना कळविण्यात येते की, सरळसेवा भरती सन 2015 आरोग्य सेवक (महिला) संवर्गामधील पदे माजी सैनिकाच्या महिला उमेदवारासाठी  भरण्यात येत आहेत. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद,पुणे अंतर्गत आरोग्य सेवक महिला या संवर्गाची नोंव्हेबर 2015 मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर पदासाठी शैक्षणिक पात्रता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि सहायक परिचारीका प्रसविका परिक्षा उत्तीर्ण आणि सहायक परिचारीका प्रसविका परिक्षा उत्तीर्ण(ए.एन.एम. 18महिन्याचे प्रशिक्षण उत्तीर्ण)अणि महाराष्ट्र परिचार्या मध्ये किंवा विदर्भ परिचर्य परिषेदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा महिला उमेदवार पात्र असतील. या करीता शैक्षणिक अर्हता धारक पात्र माजी सैनिकांच्या पत्नी व पाल्य (महिला) उमेदवारांची नावे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद यांच्याकडे 15 नोव्हेंबर 2015 पर्यंत पाठवावे. तरी या संधीचा माजी सैनिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे मेजर ( नि ) सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.

 
Top