उस्मानाबाद - महाराष्ट्र शैक्षणिक संस्था(शुल्क विनियमन) अधिनियमन 2011 राज्यात लागू करण्यात आला आहे.महाराष्ट्र शैक्षणिक संस्था( शुल्क विनिमयन)नियम 2015 शासनाने 24 सप्टेंबर 2015 अन्वये प्रसिध्द केले आहे.
या नियमावलीचे प्रारूप प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या http://www.depmah.com या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.या मसुद्याच्या सबंधीत हरकती,आक्षेप किंवा सुचना 23 आक्टोंरबर 2015 पुर्वी depmah@gmail.com या ई-मेलवर अथवा समक्ष/टपालाने आयुक्त शिक्षण (बालभारती) महाराष्ट्र राज्य,पाठयपुस्तक निर्मित व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, सेनापती बापट मार्ग, पुणे -4 यांच्याकडे पाठवाव्यात, असे शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी कळविले होते. तथापि सदर आक्षेप किंवा सुचना नोंदविण्या बाबत 5 नोव्हेंबर पर्यत मुदत वाढ देण्यात आली आहे, असे शिक्षण उपसंचालक (प्राथमिक) यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.