उस्मानाबाद - राज्य विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे रविवार, दिनांक 1 नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी 10-30 वाजता औरंगाबादहून साईनगर, रांजणी, ता. कळंब येथे आगमन आणि नॅचरल शुगर ॲन्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडमार्फत रांजणी गावास शुद्ध पाणी देण्यासाठी आरओ प्लान्टचे उदघाटन. सकाळी 11 वाजता नॅचरल शुगर ॲन्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडचा सन 2015-16 चा 16 व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2 वाजता मोटारीने रांजणीहून येवती, ता. उस्मानाबादकडे प्रयाण. दुपारी 2-45 वाजता येवती येथे लोकसेवा समिती संचलित संस्थेच्या आश्रमशाळा आणि चारा छावणीस भेट. त्यानंतर सोईनुसार येवतीहून औरंगाबादकडे प्रयाण.