उस्मानाबाद    -   राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. तसेच माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.
    यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी उद्धव घुगे, तहसीलदार शिवकुमार स्वामी, नायब तहसीलदार राजाराम पाचभाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 
           तत्पूर्वी, आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयापासून एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडमध्ये विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचारी यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी तसेच विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
                                                     

 
Top