उस्मानाबाद :- जिल्हृयातील माजी सैनिकांच्या, विधवांच्या पाल्यांना, युवकांना कळविण्यात येते की, महासैनिक ट्रेनिंग सेंटर बुलढाण येथे सेक्युरिटी कोर्स क्र.1 दि.26 ऑक्टोबर पर्यत, कोर्स क्र.2 हा 31 ऑक्टोबर 23 नोव्हेंबर पर्यत, कोर्स क्र.3 हा 28 नोहेंबर ते 21 डिसेंबर आणि कोर्स क्र.4 हा 26 डिसेंबर 18 जानेवारी पर्यत चालणार आहे. तसेच यासाठी पाच हजार दोनशे रुपये एवढे शुल्क भरावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी मो.क्र. 9168706633 व 9168706622 या क्रमांकावर संपर्क साधावा. तरी इच्छुक माजी सैनिकांच्या, विधवांच्या व इतर नागरिंकांच्या पाल्यांनी व युवकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मेजर (नि)सुभास सासने,जिल्हा सैनिक अधिकारी,उसमानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.