उस्मानाबाद :- जिल्हृयातील नोहेंबर व डिसेंबर 2015 या कालावधीत मुदत संपणा-या तसेच विभाजनामुळे नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी तीन टप्पयातील निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी घोषित केला आहे. त्यानुसार सबंधीत तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट निवडणूकीसाठीची निवडणूक प्रक्रिया सरू झालेली आहे.
           ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकीच्या संदर्भात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सबंधीत तालुक्यातील सार्वत्रिक व पोटनिवडणूकीसाठी आचारसंहिता प्रमुख म्हणून सर्व संबंधीत गटविकास अधिकारी पंचायत समिती यांची नेमणूक करण्यात आली आहे. 
            संबंधीत गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांचे अधिनस्त ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडूकीच्या आचारसंहितेचा भंग होणार नाही.यांची दक्षता घ्यावी,तसेच राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यानी वेळोवेळी  दिलेल्या निर्देश/आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करावी. संबंधीत तहसिलदार यांना सदर निवडणूक कामी योग्य ते सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.    
 
Top