उस्मानाबाद -  जिल्हृयातील सर्व माजी सैनिकांना/विधवांना कळविण्यात येते की, केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेकडून शैक्षणिक वर्ष 2015-16 साठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजेनेची घोषणा करण्यात आली. तरी जिल्हृयातील पात्र माजी सैनिक/विधवानी आपल्या पाल्यासाठी शैक्षणिक वर्ष 2015-16 मध्ये व्यवसायिक पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतले आहेत, त्यांनी आवेदन पत्र, चेकलीस्ट प्रमाणे सर्व कागदपत्रांसह दि. 10 नोव्हेंबर पर्यत जिल्हा सैनिक कार्यालय येथे सादर करावीत आवेदन पत्र चेकलिस्ट व इतर सर्व माहिती संकेत स्थळावर www.desw.gov.in. या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच श्रेणी एक ते श्रेणी सहापर्यंतची प्रकरणेही जास्तीत जास्त दाखल करावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.                       
 
Top