उस्मानाबाद - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस व माजी पंतप्रधान स्व.श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दि.31 ऑक्टोबर रोजीचे औचित्य साधून राष्ट्रीय संकल्प दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असून याबाबत संबंधित यंत्रणेला आदेशित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी,उस्मानाबाद यांनी दिली आहे. 
      या दिनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व क्रीडा अधिकारी यांच्या समन्वयाने सकाळी  जिल्हाधिकारी कार्यालय ते शिवाजी चौकापर्यंत एकता दौड, सर्व विभागाच्या समन्वयाने  पोलीस विभागामार्फत जिल्हा पोलीस मुख्यालयात पोलीस संचलन व मानवंदना,  तसेच सर्व कार्यालयामार्फत विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ ग्रहण करणे, मिरवणूका आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.                  

 
Top