पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी परिसरात विज पडून पती-पत्नीसह तिन शेतकरी जखमी होऊन एका पाळीव कुत्र्याचा मृतू झाल्याची घटना पांगरी व घोळवेवाडी शिवारात घडली.
सागर अरविंद चव्हाण वय 27 रा.पांगरी, शशिकांत शामराव घोळवे वय 45रा.घोळवेवाडी व पुष्पा शशिकांत घोळवे वय 40 रा.घोळवेवाडी अशी विजेच्या धक्क्याने भाजून जखमी झालेल्या शेतकर्‍यांची नांवे असून त्यांच्यावर बार्शीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी पांगरी भागात सोसाट्याचा वादळ वारा व विजांच्या कडकडाट होऊन पावसाने अल्पशी हजेरी लावली.दरम्याना पांढरी रोड वरील आपल्या शेतात झाडाखाली बसलेल्या सागर चव्हाण यांच्या पाठीमागून  विज  चाटून गेली.त्यामुळे सागर यांना घासून गेल्यामुळे ते जखमी झाले असून त्यांच्यावर बार्शीच्या जगदाळे मामा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
   दुसर्‍या घटनेत शशिकांत घोळवे व पुष्पा घोळवे हे पती पत्नी सुदैवाने या घटनेतून वाचले आहेत.हे दोघे आपल्या शेतात कुळवणीचे काम करत होते.दरम्यान आकाश भरून येऊन पावसाळा सुरुवात झाली.त्यामुळे हे पतीपत्नी शेतातीलच आपल्या असलेल्या पत्रयाच्या शेडमध्ये जावून बसले असता त्यांच्यापासून दोन फुटावरच बसलेल्या त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या अंगावर विज कोसळली.विज कुत्र्यांवर कोसळल्यामुळे तेथे अचानक आगीचा गोला पडल्यासारखे होऊन डोळे दिपवणारा प्रकाश पडला.कुत्रे भाजल्यामुळे जिवाच्या आकांताने शेडबाहेर किंचाळत जावून पडून जवळच जावून मृत झाले.घोळवे पती पत्नीनाही विज घासून गेल्यामुळे तेही  भाजून जखमी झाले आहेत.
 
Top