उस्मानाबाद :- येथील सहायक आयुक्त,समाज कल्याण, उस्मानाबाद व धाराशिव ज्येष्ठ नागरिक संघटना, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिन डाँ.बाबासाहेब सामाजिक न्याय भवन सभागृह येथे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिमराव डिग्गीकर व प्रमुख पाहूणे म्हणून उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर तर प्रमुख वक्ते म्हणून प्रमुख वक्ते साप्ताहिक तेजोमय महाराष्ट्रचे संपादक शरद पवार, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक भास्कराव नायगावकर, उमाकांत नायगावकर, समाज कल्याण विभागाचे अमित घवले यांची उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते 75 वर्ष पुर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून व्यंकटेश डांगे,भास्कर नायगावकर, शरद पवार यांनी मनोगतात वृध्दाश्रमाची खरी गरज ही निराधारांना असते. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी आत्मचिंतन व अध्यात्माची गरज व वृध्दांना आर्थिक गरजेपेक्षा भावनिक गरज जास्त आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या जिवनातील प्रत्येक क्षणाचा उत्सव साजरा करता येणे गरजेचे असल्याचे सांगितले तर श्रीमती करमरकर यांनी जेष्ठ नागरिकाबाबत शासनाच्या भूमिका मांडली आणि श्री.घवले यांनी ज्येष्ठ नागरिकांचे पाल्य सांभाळत नसेल तर त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करुन दाद मागता असे मार्गदर्शनात नमूद केले. या कार्यक्रमास शहरातील असंख्य ज्येष्ठ नागरिक व संबंधित मोठया संख्येने उपस्थिती होती