सकाळच्या हेडलाईन्स - शुक्रवार २ ऑक्टोबर २०१५
~~~~~~~~~~~~~~
▫सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्याच्या हद्दीत असलेल्या मुळेगाव व भानुदास तांड्यावर अचानकपणे धाड टाकून २ लाख ३६ हजारांची अवैध दारू जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केली. ही कारवाई गुरुवार १ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ च्या सुमारास केली. याप्रकरणी सात हातभट्टी चालकांविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▫सोलापूर : एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पासपोर्ट विभागातील पोलीस कर्मचारी प्रवीण महेश भोसले यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी गुरुवारी निलंबित केले.
▫पुणे : दांडेकर पुलाजवळील एका गोडाऊनला आग लागल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरु आहे.
▫ जऴगाव : विवरा गावाजवळ ट्रकची दुचाकीला धडक, अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू तर एक जण जखमी, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
▫नांदेड जिल्ह्यात तीन ठिकाणी वीज कोसळली, वीजे पडल्यामुळे चौघांचा मृत्यू, पाच जण जखमी
▫ पुणे : पीएमपीच्या पाच ठेकेदारांनी अचानक पुकारला संप, ६५० बस झाल्या बंद, प्रशासनाला न कळवताच संप पुकारल्याने ठेकेदारांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी
▫ नागपूर : भाजयुमोचा पदाधिकारी सुमित ठाकूर याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरन्ट, मोक्काच्या खटल्यानुसार मिळालेला जामीन रद्द
----------------------
✏ वृतसंकलन-भाऊ वलेकर
~~~~~~~~~~~~~~